Pilibhit Conversion : पीलीभीत (उत्तरप्रदेश) येथे आमीष दाखवून धर्मांतर करणार्‍याला अटक !

ख्रिस्ती बनल्यास सरकारी नोकरी देऊ, सुंदर मुलीशी लग्न लावून देऊ, असे देत होता आमीष !

आरोपी अनोखेलाल

पीलीभीत (उत्तरप्रदेश) – येथे आमीष दाखवून ख्रिस्ती बनण्यासाठी दबाव टाकणार्‍या अनोखेलाल नावाच्या धर्मांतरित मिशनरी व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. तो ग्रामस्थांना सरकारी नोकरी आणि सुंदर मुलीशी लग्नाचे आमीष दाखवून ख्रिस्ती पंथ स्वीकारण्यासाठी दबाव टाकत होता. ग्रामस्थांनी त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रचारासाठी त्याला निधी कुठून मिळत होता आणि तो कुठल्या विभागासाठी काम करत होता, याचे अन्वेषण पोलीस करत आहेत.

येशूने दुष्ट आत्म्यापासून मुक्त केल्याने धर्मांतर केल्याचा दावा

अनोखेलालने सांगितले की, तो २० वर्षांपासून ख्रिस्ती पंथाचा प्रसार करत आहे आणि तो या कामाला ‘भलाईचे काम’ मानतो. त्याने दावा केला की, त्याच्या मागे एक दुष्ट आत्मा लागला होता. तो त्याला आत्महत्येसाठी प्रवृत्त करत होता. तो देहलीत एका व्यक्तीला भेटला. त्याने त्याला बायबल वाचण्याचा सल्ला दिला. यानंतर येशू ख्रिस्ताने त्याला त्या दुष्ट आत्म्यापासून मुक्त केले. (हिंदूंना धर्मशिक्षण मिळत नसल्याने अशा प्रकारच्या अन्य धर्मियांच्या थोतांडाला बळी पडून हिंदू आत्मघात आणि राष्ट्रघात करत आहेत ! हे रोखण्यासाठी हिंदूंच्या संघटनांनी हिंदूंना धर्मशिक्षण दिले पाहिजे ! – संपादक) त्यानंतर त्याने ख्रिस्तीमध्ये धर्मांतर केले. तेव्हापासून तो गावोगावी जाऊन ख्रिस्ती पंथाचा प्रसार करतो. (बाटगे अधिक कट्टर असतात, हेच यातून दिसून येते ! – संपादक)

संपादकीय भूमिका

आणखी किती वर्षे हिंदूंनी अशा प्रकारच्या धर्मांतराच्या घटना पहात रहायच्या ? केंद्र आणि राज्य सरकारे याविरोधात कठोर उपययोजना का काढत नाहीत ? काँग्रेसच्या राज्यात अवघ्या काही वर्षांत ईशान्य भारतातील राज्ये ख्रिस्तीबहुल झाली, तर हिंदुत्वनिष्ठ सरकारांच्या राज्यात हिंदु धर्मांतरापासून सुरक्षित का राहू शकत नाहीत ?, असा प्रश्न हिंदूंच्या मनात येतो !