अनेक कब्रस्तान (स्मशान) आणि दर्गा यांचा समावेश
(दर्गा म्हणजे मुसलमानांच्या कथित सिद्धपुरुषांचे समाधीस्थळ)
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशात वक्फ मालमत्तांच्या ‘डिजिटलायझेशन’च्या प्रक्रियेत मोठी स्वच्छता मोहीम राबवली जात असून यामुळे सतत नोंदणी रहित केल्या जात आहेत. आतापर्यंत ‘उम्मीद’ पोर्टलवर (संकेतस्थळावर) नोंदवलेल्या १ लाख १८ सहस्र ३०२ मालमत्तांपैकी ३१ सहस्र ३२८ मालमत्तांची नोंदणी रहित करण्यात आली आहे. यात अनेक जुन्या कब्रस्तान आणि दर्गे यांच्या मालमत्तांचाही समावेश असण्याची शक्यता आहे. तपासणीत या वक्फ मालमत्तांच्या कागदपत्रांमध्ये अनेक त्रुटी आढळल्याची माहिती सूत्रांनी दिली. अल्पसंख्यांक मंत्रालयाने गेल्या वर्षी ५ जून या दिवशी प्रारंभ केलेल्या ‘उम्मीद’ पोर्टलवर वक्फ मालमत्तांची नोंदणी करण्याची प्रक्रिया चालू आहे.
आतापर्यंत ५३ सहस्र मालमत्तांना संमती
प्रारंभीच्या टप्प्यात नोंदणीसाठी ६ महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता; मात्र उत्तरप्रदेश सुन्नी आणि शिया सेंट्रल वक्फ बोर्ड यांच्या आवाहनावर वक्फ लवादाने नोंदणीची मुदत आणखी ६ महिन्यांनी वाढवली होती. ही अतिरिक्त मुदत पुढील महिन्यातील ५ जूनला संपत आहे. आतापर्यंत केवळ ५३ सहस्रांहून अधिक मालमत्तांना संमती मिळू शकली आहे. २० सहस्र ५४६ मालमत्तांच्या कागदपत्रांची तपासणी अंतिम टप्प्यात आहे.

India Slams Bangladesh : अल्पसंख्यांकांवरील अत्याचार आणि त्यांच्या धार्मिक भावनांशी होणारा खेळ भारत सहन करणार नाही !
(म्हणे) ‘सरकार आता भाजपच्याच भूमिकेची री ओढत आहे का ?’ : Udhayanidhi Stalin
गायीला राष्ट्रमाता घोषित करा ! – पू. किशोरशास्त्री दवे
भिलवाडा (राजस्थान) येथे ६ दिवसांचे ‘सनातन संस्कार प्रशिक्षण’ शिबिर पार पडले !
हिंदु जनजागृती समितीचे शंभू गवारे आणि सनातन संस्थेच्या बबिता गांगुली यांना ‘मातृभूमी सन्मान’ पुरस्कार प्रदान !
तुर्भे रेल्वेस्थानकाच्या जवळील पदपथांची दुरवस्था !