मुंबईतील तरुणाची तरुणीकडून २१ लाख रुपयांची फसवणूक ! 

६९ लाख रुपयांचा लाभ दाखवून घेतली रक्कम !

मुंबई – ‘बंबल’ या डेटिंग (भेटीगाठीच्या) ॲपवरून भायखळ्यातील ३८ वर्षांच्या इंटिरियर डिझायनरला २१ लाख ५ सहस्र रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे. त्याची एका अज्ञात तरुणीशी ओळख झाली. मैत्री झाल्यावर तिने त्याचा विश्वास संपादक केला. तिने एका ऑनलाईन संकेतस्थळावर गुंतवणूक करण्यास सुचवले. ‘अल्प कमी कालावधीत मोठा लाभ मिळेल’, असे आमीष दाखवत तिने तरुणाला गुंतवणुकीस प्रवृत्त केले. त्याने ५० सहस्र रुपये गुंतवले. आरोपींनी त्याला वारंवार अधिक रक्कम गुंतवण्यास भाग पाडले. त्यानंतर त्याने १० लाख रुपये आणि ११ लाख रुपये भरले. त्याला प्रारंभी ६९ लाख रुपयांचा लाभ दिसत होता; मात्र प्रत्यक्षात तो पूर्णपणे बनावट होता. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने तक्रार प्रविष्ट केली. या प्रकरणी अधिक अन्वेषण चालू आहे.

संपादकीय भूमिका

गुंतवणूक करतांना सतर्कता बाळगणे आवश्यक ! फसवणूक करणार्‍या सायबर चोरांना अटक करून त्यांच्याकडूनच दंडात्मक वसुली केल्याविना अशा घटनांना आळा बसणार नाही !