
सातारा, २२ मे (वार्ता.) – शहरात माजी सैनिक कल्याण विभाागाकडील जागेमध्ये भव्य आणि आदर्श असे ‘माजी सैनिक एकात्मिक अद्ययावत् संकुल’ उभारावे, अशा सूचना पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. पालकमंत्री देसाई म्हणाले, ‘‘करंजे येथील माजी सैनिक कल्याण विभागाकडे असलेल्या ११ एकर जागेमध्ये उभारण्यात येणार्या या संकुलामध्ये भव्य ‘मॉल’ (व्यापारी संकुल) उभारावा. त्यामध्ये बचतगटांच्या उत्पादन-विक्रीसाठी किमान २५ टक्के जागा आरक्षित असावी, तसेच त्यात उपाहार गृहाची व्यवस्था असावी.
या जागेची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांनी पहाणी करून नियुक्त केलेल्या वास्तूविशारदाशी बोलून १५ दिवसांत आराखडा सिद्ध करावा. आवश्यकता भासल्यास जुनी बांधकामे काढावीत आणि सद्यःस्थितीतील काही कार्यालये अन् संकुल तात्पुरती स्थलांतरीत करण्याचा प्रस्ताव सैनिक कल्याण कार्यालयाने सादर करावा. सद्यःस्थितीत ही जागा राज्यपालांच्या मालकीची आहे. जागा अधिग्रहणासाठीचा सविस्तर प्रस्ताव १५ दिवसांत माझ्याकडे द्यावा. म्हणजे मला राज्यपालांकडे मागणी करून पाठपुरावा करता येईल.’’
वीजदेयकांविषयीचा प्रश्न सुटेपर्यंत स्मार्टमीटर बसवणे स्थगित ! – मुख्यमंत्री प्रमोद सावंत
३७० कलम रहित करणे आणि श्रीराममंदिराची उभारणी, ही पंतप्रधान मोदी यांची महान कार्ये ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
भायखळा आणि भिवंडी येथे ‘मराठी भाषा प्रशिक्षण केंद्र’ चालू करा ! – आमदार रईस शेख, समाजवादी पक्ष
भेसळ आणि दराच्या वादात गुर्हाळ व्यवसाय संकटात !
शेगावच्या प्रसिद्ध कचोरी केंद्रावर धाड !
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील १८८ गावांतील ग्रामपंचायतींना गावठी मद्य निर्मितीविषयी नोटिसा !