
चंद्रपूर – जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही अरण्यात तेंदूपत्ता गोळा करत असतांना १३ महिलांवर वाघिणीने आक्रमण केले. या भीषण घटनेत ४ महिलांचा मृत्यू झाला, तर इतर महिला बचावल्या. ही घटना २२ मे या दिवशी सकाळी ९ वाजता घडली. अचानक झालेल्या आक्रमणामुळे महिला घाबरल्या. एका महिलेने गावात येऊन माहिती दिल्यानंतर ग्रामस्थ घटनास्थळी पोचले. मृत महिलांमध्ये कवडूबाई, अनुबाई, संगीता आणि सुनीता मोहुर्ले यांचा समावेश आहे. वन विभागाने अन्वेषण चालू केले असून परिसरात गस्त वाढवण्यात आली आहे. गतवर्षीही याच भागात ३ महिलांचा वाघाच्या आक्रमणात मृत्यू झाला होता.
बोपोडी येथील दर्ग्यावर महापालिकेची कारवाई !
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त रवींद्र भवन सांखळीच्या वतीने ‘गीत सावरकर’ कार्यक्रम सादर
कणकवली नगरपंचायतीची अतिक्रमणाच्या विरोधात धडक कारवाई !
नवी मुंबईत सत्ताधार्यांच्या १०० दिवसांच्या कामांचा मनसेकडून पंचनामा !
सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकतांना पकडलेल्या युवकाची आत्महत्या
ह.भ.प. विनायक केशव कुलकर्णी यांना शिर्डी येथे ‘महाराष्ट्र गुणगौरव समाजरत्न’ पुरस्कार प्रदान !