
म्हापसा – ध्वनीप्रदूषणावरून हणजूण येथील ‘क्लब डायझ’ वादग्रस्त ठरलेला आहे. नियमांचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणी हणजूण-कायसूव पंचायतीने ‘क्लब डायझ’ला पुन्हा टाळे ठोकले आहे. मार्च २०२६ मध्ये गाववाडी, हणजूण येथे असलेला ‘क्लब डायझ’चा व्यवसाय परवाना हणजूण पंचायतीने रितसर पद्धतीने रहित केला होता; मात्र पंचायतीने व्यवसाय परवाना रहित करूनही क्लबने व्यवसाय चालूच ठेवला होता आणि या ठिकाणी पार्ट्यांचेही आयोजन केले जात होते. या पार्ट्यांमध्ये ध्वनीप्रदूषण केले जात होते. गतवर्षी जून मासात ध्वनीप्रदूषणावरून या क्लबला टाळे ठोकण्यात आले होते. वर्ष २०२४ मध्येही गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने क्लबचा व्यवसाय परवाना रहित केला होता; मात्र टाळे ठोकण्याची कारवाई होऊनही क्लबचे व्यवस्थापन कारवाईच्या काही दिवसांनतर व्यवसाय चालू करण्यास यशस्वी ठरत आहे. यामुळे कारवाईविषयी स्थानिकांमध्ये असंतोष आहे.
अकोला महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभागृहाला दिलेले ‘टिपू सुलतान’चे नाव अवैध !
सनातन धर्मासाठी हिंदु जनजागृती समितीसमवेत कार्य करीन ! – पू. स्वामी भक्ती प्रकाशजी महाराज
‘जीवोत्तम विद्यापीठ’ : भारतीय ज्ञानपरंपरेचे आधुनिक पुनरुज्जीवन !
डोंबिवली येथे ‘महावितरण’चा खांब कोसळून २ दुचाकींची हानी !
तावडे हॉटेल परिसरातील २३ अनधिकृत बांधकामे तोडली : महापालिकेची कारवाई
मदरशातील अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार; शिक्षकाच्या विरोधात गुन्हा नोंद