२४ मे या दिवशी सायंकाळी ६ वाजता जुन्या बसस्थानकावर सभेचे आयोजन

फोंडा (गोवा), २१ मे – ‘हिंदु राष्ट्रा’चा आवाज बुलंद करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येत्या २४ मे २०२६ या दिवशी सायंकाळी ६ वाजता जुने बसस्थानक, फोंडा येथे भव्य ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभा’ आयोजित करण्यात आली आहे. या सभेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे भाग्यनगरचे (हैदराबादचे) धडाडीचे आमदार तथा ‘श्रीराम युवा सेना’चे संस्थापक-अध्यक्ष श्री. टी. राजासिंह हे या सभेला संबोधित करणार आहेत. त्याचप्रमाणे सभेला हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभणार आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे गोवा राज्य संघटक श्री. सत्यविजय नाईक यांनी २१ मे या दिवशी फोंडा येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेला ‘मर्दनगड संवर्धन समिती’चे सर्वश्री मनोज गावकर आणि राजेंद्र देसाई, तसेच हिंदुत्वनिष्ठ श्री. स्वप्निल नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.
पत्रकार परिषदेत श्री. सत्यविजय नाईक पुढे म्हणाले, ‘‘भारताच्या राज्यघटनेच्या प्रस्तावनेत प्रत्येक नागरिकाला समता, बंधुता आणि न्याय देण्याचे नमूद केले आहे; परंतु प्रत्यक्षात देशात अल्पसंख्यांकांसाठी स्वतंत्र आयोग आणि मंत्रालय असतांना बहुसंख्य हिंदूंना संरक्षण देणारी अशी कोणतीही यंत्रणा नाही. मुसलमान आणि ख्रिस्ती यांना धार्मिक शिक्षण देणार्या शाळांना सरकारी अनुदान मिळते; मात्र हिंदूंना भगवद्गीतेचे शिक्षण देण्यावर आक्षेप घेतला जातो. देशभर केवळ हिंदूंच्याच मंदिरांचे सरकारीकरण केले जाते, तर मशिदी आणि चर्च मात्र स्वतंत्र ठेवले जातात. हा दुजाभाव का? अल्पसंख्यांकांना धर्माच्या आधारावर शैक्षणिक अनुदान, मग बहुसंख्य हिंदूंनी काय अपराध केला आहे ? हे सर्व पहाता भारतात खरोखरच ‘सेक्युलर’ (धर्मनिरपेक्ष) व्यवस्था अस्तित्वात आहे का?
या सर्व अन्यायांना वाचा फोडण्यासाठी आणि हिंदूसंघटन भक्कम करण्यासाठी या सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
गोवा सरकारने ‘गोवा प्राचीन स्मारके आणि पुरातत्व स्थळे आणि अवशेष कायदा, १९७८’ अंतर्गत फोंडा येथील मर्दनगड आणि जुने गोवे येथील ‘हातकातरो खांब’ या ऐतिहासिक वास्तूंचे संरक्षण अन् संवर्धन करण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. पुरातत्व खात्याने याविषयी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. गोव्यातील सर्व गड किल्ले, तसेच गड-किल्ल्यांचा इतिहास आणि संस्कृती यांचे संवर्धन करून हा ऐतिहासिक ठेवा भावी पिढीपर्यंत पोचवणे यासाठी मर्दनगड संवर्धन समितीने पुढाकार घेतला आहे. हिंदु जनजागृती समितीचाही मर्दनगड संवर्धन समितीमध्ये सक्रीय सहभाग आहे.’’
‘मर्दनगड संवर्धन समिती’चे श्री. राजेंद्र देसाई यांनी पत्रकार परिषदेत मर्दनगड संवर्धन समितीच्या कार्याची माहिती दिली आणि सरकारने मर्दनगडाचे संवर्धन करण्याचे दायित्व घेण्याचे आवाहन केले.
हिंदु जनजागृती समितीने आतापर्यंत देशभरात २ सहस्र १८२ हिंदु राष्ट्र-जागृती सभांच्या माध्यमातून २० लाखांहून अधिक हिंदूंचे यशस्वी प्रबोधन केले आहे. हिंदु बांधवांनी या सभेला बहुसंख्येने उपस्थित राहून ‘हिंदु राष्ट्रा’चा आवाज अधिक बुलंद करावा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
‘हिंदु राष्ट्र-जागृती सभे’च्या २ फलकांचे हिंदुद्वेष्ट्यांकडून काळे फासून विद्रूपीकरण !
पोलिसात तक्रार प्रविष्ट फोंडा – येथे २४ मे या दिवशी सायंकाळी ६ वाजता होणार्या ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभे’च्या फोंडा शहर परिसरातील जुने बसस्थानक आणि कुडतडकरनगरी येथे लावण्यात आलेल्या फलकांवर हिंदुद्वेष्ट्यांनी काळ्या रंगात आकृत्या काढल्या आहेत. हिंदु जनजागृती समितीने याविषयी फोंडा पोलीस ठाण्यात रितसर तक्रार नोंदवली आहे आणि सीसीटीव्ही चित्रीकरणाद्वारे संशयितांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. हिंदूंच्या संयमाचा अंत पाहू नये ! – प्रदीप बखले, ढवळी-फोंडा येथील हिंदु धर्माभिमानी शांतताप्रिय गोव्यात हिंदु धर्माचे कार्य चालू आहे. धर्माचा प्रचार करण्याचा सर्वांना अधिकार आहे. गोवा ही परशुरामभूमी आहे आणि अशा भूमीत फोंडा येथे होणार्या सभेला भाग्यनगरचे (हैदराबाद) धडाडीचे आमदार तथा ‘श्रीराम युवा सेना’चे संस्थापक-अध्यक्ष श्री. टी. राजासिंह हे संबोधित करणार आहेत. यामुळे या सभेच्या प्रचाराला गोवाभरातून प्रचंड प्रतिसाद लाभत आहे. या पार्श्वभूमीवर सभेच्या प्रचाराच्या फलकाचे विद्रूपीकरण होणे, ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. हिंदू जेव्हा संघटित होतात, तेव्हा अशा प्रकारे विघ्न आणून समाजात असंतोष निर्माण करण्याचे सातत्याने प्रयत्न होत असतात. हिंदु जनजागृती समिती प्रत्येक सभेचे आयोजन उत्कृष्टपणे करत असते आणि याची प्रचीती हिंदुद्वेष्ट्यांना आलेली आहे. हिंदू शांततेने धर्मप्रचार करतात; मात्र याचा अपलाभ कुणीही उठवू नये आणि हिंदूंच्या संयमाचा अंत पाहू नये. विरोधामुळे हिंदु राष्ट्र स्थापनेच्या तेजस्वी विचाराचा प्रचार थांबू शकत नाही ! – सत्यविजय नाईक, गोवा राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या माध्यमातून हिंदु राष्ट्र स्थापनेच्या तेजस्वी विचाराचा सर्वत्र प्रचार होत आहे. विरोध करणार्यांनी कितीही विरोध केला, तरी हिंदु राष्ट्र स्थापनेचा प्रचार कदापि थांबणार नाही. |

ढवळी परिसरात बिबट्याचे आक्रमण
मळेवाड येथे बिबट्याच्या आक्रमणात वासराचा मृत्यू
गोव्यातील ५६ गावांच्या शहरीकरणाच्या अधिसूचनेला विरोध
अत्याचार केल्याप्रकरणी धर्मांधाला सश्रम कारावास आणि दंड !
आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज
पक्षातील एकही खासदार फुटणार नसल्याचा शरद पवार यांना विश्वास !