उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त लहान मुलांसाठी ३१ मे या दिवशी विनामूल्य हृदय पडताळणी शिबिर !

पत्रकार परिषदेत माहिती देतांना प्रशांत साळुंखे (डावीकडून तिसरे), तसेच अन्य

कोल्हापूर, २१ मे (वार्ता.) – राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ६२ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लहान मुलांसाठी ३१ मे या दिवशी विनामूल्य हृदय पडताळणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. याचा गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ‘शिवसेना वैद्यकीय मदत कक्षा’चे पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख प्रशांत साळुंखे यांनी पत्रकार परिषदेत केले. या प्रसंगी वैद्यकीय मदत कक्षाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

प्रशांत साळुंखे पुढे म्हणाले, ‘‘शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन, ज्युपिटर हॉस्पिटल-पुणे आरोग्यदूत फाऊंडेशन आणि शिवसेना कोल्हापूर जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने हे भव्य शिबिर पार पडणार आहे. सदर शिबिरासाठी प्रमुखतज्ञ डॉ. राहुल सराफ, डॉ. अभिजित नाईक उपस्थित रहाणार आहेत. हे शिबिर सेवा रुग्णालय, कसबा बावडा येथे सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत होणार आहे. ’’