कोल्हापूर जिल्ह्यातील ४ सहस्र विक्रेते बंदमध्ये सहभागी

कोल्हापूर, २० मे (वार्ता.) – अवैध ऑनलाईन औषध विक्रीला विरोध, तसेच अन्य मागण्यांसाठी अखिल भारतीय औषध विक्रेत्यांनी २० मे या दिवशी देशव्यापी बंद पुकारला होता. या बंदमध्ये जिल्ह्यातील ४ सहस्र विक्रेते सहभागी झाले. याचा एक भाग म्हणून ‘कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशन’च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चा संपल्यावर निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना निवेदन देण्यात आले.
या वेळी राज्यसंघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे म्हणाले, ‘‘केंद्रशासनाचे संबंधित विभागाचे मंत्री, तसेच संबंधित प्रशासकीय अधिकारी यांना वारंवार निवेदने देऊन, तसेच प्रत्यक्ष भेटीसाठी वेळ मागूनही सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. सरकारकडून प्रतिसाद न मिळाल्यामुळे संघटनेला आंदोलनात्मक भूमिका घ्यावी लागली.’’ या प्रसंगी ‘जिल्हा केमिस्ट असोसिएशन’चे उपाध्यक्ष सर्वश्री किरण जाधव, सचिव प्रल्हाद खवरे, माजी अध्यक्ष संजय शेटे, खजिनदार दाजीबा पाटील, संचालक महेश सावंत, देवल कुलकर्णी, आदित्य चौगुले, विजय देवणे, अतुल पाटील, पुरुषोत्तम मगदूम यांसह जिल्ह्यातील औषध विक्रेते यात सहभागी होते.
विविध मागण्यांचे लक्षवेधी फलक
‘अवैध ऑनलाईन फार्मसी बंद करा-रुग्णांचा जीव वाचवा’, ‘रुग्ण सुरक्षा हाच निर्धार-ऑनलाईन फार्मसीला जोरदार विरोध आमचा’, ‘जनतेच्या आरोग्याचा प्रश्न-ऑनलाईन फार्मसीला विरोधच ठाम’, ‘अवैध ऑनलाईन व्यापार नको-जनतेच्या जिवाशी व्यवहार नको’, अशा आशयाचे आंदोलकांच्या हातातील फलक लक्ष वेधून घेत होते.
राष्ट्रीय आयोगाकडून पिंपरी-चिंचवड महापालिकेला नोटीस !
शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे पोलिसांना शरण !
प्रत्येक पात्र मतदाराची अचूक नोंद सुनिश्चित करावी ! – एस्. चोकलिंगम, मुख्य निवडणूक अधिकारी
अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याने हॉटेल, बेकरी, डेअरी यांचे परवाने निलंबित !
उल्हासनगर येथील गोठ्यांतून ‘ऑक्सिटोसिन’च्या ६१२ बाटल्या जप्त !
‘राजेश नाईक फाऊंडेशन’कडून फलटण येथे वारकर्यांना राजगिराचे लाडू, तसेच फराळ वाटप !