विद्यापिठाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह

पुणे – ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठा’च्या परीक्षा विभागाने ‘डिप्लोमा इन टॅक्सेशन अँड लॉ’(डी.टी.एल्.) अभ्यासक्रमाची ‘लेखांकन आणि हिशोबशास्त्र’ विषयाच्या नवीन परीक्षा पद्धतीनुसार १०० गुणांची प्रश्नपत्रिका सिद्ध केली होती. ही संपूर्ण प्रश्नपत्रिका एका खासगी प्रकाशनाच्या पुस्तकातून जशीच्या तशी (कॉपीपेस्ट) घेण्यात आल्याचा गंभीर आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. या प्रश्नपत्रिकेतील आठही प्रश्न हे ‘लॉयर्स कंपॅनियन ऑन बुक किपिंग अँड अकाऊंटन्सी फॉर डी.टी.एल्.’ या पुस्तकातून घेतले आहेत. हेच प्रश्न वर्ष २००३ मध्ये ‘डी.ई.एस्. श्री नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालया’च्या अंतर्गत घेण्यात आलेल्या परीक्षेत विचारण्यात आले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रश्नपत्रिका सिद्ध करण्याच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेमुळे विद्यापिठाच्या शैक्षणिक गुणवत्तेची हानी होत असल्याने संबंधित प्राध्यापक आणि परीक्षा विभागातील अधिकार्यांवर कठोर कारवाईची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
भंडारा येथे अन्न आणि औषध प्रशासनाची २ औषध प्रतिष्ठानांवर कारवाई !
राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !
वाढत्या वायू प्रदूषणामुळे पुढील ३० वर्षांत २ अंशांपर्यंत तापमानवाढीचे संकट !