
कोल्हापूर – कोल्हापूर महानगरपालिकेच्या पंचगंगा, कसबा बावडा, कदमवाडी आणि बापट कॅम्प येथे स्मशानभूमी आहेत. याठिकाणी महापालिकेच्या वतीने विनामूल्य अंत्यसंस्कार करण्यात येतात. पंचगंगा स्मशानभूमी आणि इतर ठिकाणी गुप्तदान पेट्या ठेवण्यात आल्या आहेत. स्मशानभूमीत अंत्यसंस्कार आणि रक्षाविसर्जनासाठी येणारे नागरिक या दानपेटीत सढळ हाताने दान करतात. या गुप्तदान पेट्या प्रत्येक वर्षी मार्च अखेरीस उघडण्यात येतात.
पंचगंगा स्मशानभूमी येथील गुप्तदान पेटी बुधवारी उघडली असता त्यात ४ लाख १९ सहस्र ६७५ रुपये रोख, तसेच ‘ऑनलाईन’ स्वरूपात २ लाख ३० सहस्र १०९ रुपये असे ६ लाख ४९ सहस्र ७८४ रुपये इतकी रक्कम जमा झालेली आहे.
यापूर्वी वर्ष २०२५ मध्ये मिळालेली रक्कम १ लाख ६१ सहस्र ५३७ रुपये इतकी होती. स्मशानभूमीकरिता दानशूर व्यक्ती, तरुण मंडळे, नागरिक यांच्याकडून शेणी, लाकूड दान करण्यास मोठया प्रमाणात प्रतिसाद मिळतो. याविषयी सर्व दानशूर व्यक्तींचे महापालिकेने आभार व्यक्त केले आहेत.
थोडक्यात महत्त्वाचे : ०६.०६.२०२६
‘श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसर विकास आराखड्या’तील १३६ जागांचे सर्वेक्षण पूर्ण ! – डॉ. विजय राठोड, जिल्हाधिकारी, कोल्हापूर
हिंजवडी ‘आयटी पार्क’ मधील ‘थिंकटेक इंडिया’ आस्थापन रातोरात बंद !
आरे परिसरातील ८० एकर जागेत ५ लाख वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ !
श्री महालक्ष्मीदेवी मंदिरासह परिसरातील गड-दुर्ग यांना एकत्र करून ‘टुरिस्ट सर्किट’ करणार ! – शंभूराज देसाई, खनिजकर्ममंत्री
महिला पर्यटकांचे व्हिडिओ काढणार्याला अटक