बंगालच्या भाजप सरकारचा मोठा निर्णय !

कोलकाता (बंगाल) – शुभेंदु अधिकारी शासनाने उत्तर बंगालमधील धोरणात्मकदृष्ट्या अत्यंत संवेदनशील ‘चिकन नेक’ (सिलीगुडी कॉरिडोर) क्षेत्रातील सुमारे १२० एकर भूमी आणि ‘राष्ट्रीय महामार्ग ७’ केंद्राकडे हस्तांतरित करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. हे पाऊल ईशान्य भारताची सुरक्षा भक्कम करण्यासाठी उचलण्यात आले आहे.
काय आहे ‘चिकन नेक’ ?
बंगालमध्ये सिलीगुडी शहराजवळील एक अरुंद भूमीचा पट्टा आहे. हा भाग नेपाळ, भूतान आणि बांगलादेश या देशांच्या सीमांनी वेढलेला आहे. येथून चीनची सीमाही जवळ आहे. हा पट्टा अत्यंत अरुंद असून काही ठिकाणी याची रुंदी केवळ २० ते २२ किलोमीटर इतकीच आहे. हा एकमेव भूभाग उर्वरित भारताला ईशान्येकडील ८ राज्यांशी (सिक्कीम, आसाम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणीपूर, मिझोरम, त्रिपुरा आणि मेघालय यांच्याशी) जोडतो. भारताच्या नकाशावर हा भाग एखाद्या ‘कोंबडीच्या मानेसारखा’ दिसतो.
आषाढी वारीत भाविकांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घ्या ! – CM Devendra Fadnavis
Nasrapur Case : आरोपी भीमराव कांबळे दोषी; २९ जूनला सुनावणार अंतिम शिक्षा
नियमांचे उल्लंघन करणारे हॉटेल, रेस्टॉरंट आणि ढाबे यांच्या मालकांना सोडणार नाही ! – Tukaram Mundhe
‘एन्.सी.ई.आर्.टी.’च्या पाठ्यपुस्तकात मराठा साम्राज्याचा इतिहास पुन्हा समाविष्ट करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा चालू ! – दादा भुसे, शालेय शिक्षणमंत्री
मुंबई लोकलमधील धर्मांतर आणि भोंदूगिरी यांचे छुपे संकट रोखण्यासाठी विशेष नियमावली सिद्ध करणार !
२७ जूनला ‘लव्ह जिहाद’ची नवी भयावहता आणि उपाययोजना यांवर इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) येथे विशेष व्याख्यान !