अजानच्या आवाजामुळे पूर्वी झोपमोड व्हायची, आता त्यावर उपाययोजना केली आहे ! – Jaiveer Singh

उत्तरप्रदेशाचे सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री जयवीर सिंह यांचे विधान

(अजान म्हणजे मुसलमानांना मोठ्या आवाजात नमाजासाठी आमंत्रित करणे)

जयवीर सिंह

फिरोजाबाद (उत्तरप्रदेश) – प्रत्येक व्यक्तीला आपापल्या धर्माचे पालन करण्याचा अधिकार आहे, मात्र ते नियमांच्या कक्षेत असावे. पूर्वी अजानच्या खूप मोठ्या आवाजामुळे लोकांच्या झोपेत अडथळा यायचा; परंतु त्यावर उपाययोजना केल्याने आता ठराविक मर्यादेतच ध्वनीचा वापर केला जातो, असे विधान उत्तरप्रदेशाचे सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री जयवीर सिंह यांनी केले. ते शिकोहाबाद येथे आयोजित एका व्यापारी संमेलनात कायदा-सुव्यवस्था आणि ध्वनीप्रदूषण यांवर बोलत होते. त्यांच्या या विधानावर राजकीय आणि सामाजिक प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

‘प्रेमाने ऐकाल, तर भजन आणि अजान दोन्ही चांगले वाटतील ! – मौलाना यासूब

मौलाना यासूब

जयवीर सिंह यांच्या विधानावर शिया धर्मगुरु मौलाना यासूब अब्बास यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, मला मंत्री जयवीर सिंह यांना सांगायचे आहे की, गोष्टींकडे केवळ एका दृष्टीतून पाहू नका. जर तुम्ही अजानकडे पहात असाल, तर मंदिरांमध्ये सकाळी होणारी भजने आणि घंटा यांच्या आवाजाकडेही पहा. जर अजानमुळे झोपेत व्यत्यय येत असेल, तर मंदिरांमधील भोंग्यांवरील भजनांमुळेही लोकांच्या झोपेवर परिणाम होतो. (मंदिरांतील भजनांवर आतापर्यंत कुणी असा आक्षेप घेतल्याचे ऐकिवात नाही. ‘खोटे बोल, पण रेटून बोल’, या वृत्तीचे मौलाना ! – संपादक) समाजात धार्मिक परंपरांविषयी भेदभावपूर्ण वृत्ती ठेवणे योग्य नाही. गोष्टींकडे दुटप्पी दृष्टीने पाहिले जात आहे, ही खेदाची गोष्ट आहे. (यातून मौलानांनी हे तर मान्य केले की, त्यांच्या अजानमुळे जनतेची झोपमोड होते ते ? खरेतर शांतीचा संदेश देणार्‍या धर्माच्या मौलानांनी ही कृती स्वत:हून करायला हवी होती. – संपादक) जर प्रेमाच्या दृष्टीने पाहिले तर तुम्हाला ‘अल्लाहू अकबर’ (अल्ला महान आहे) हेही चांगले वाटेल आणि मंदिरातील भजनेही चांगली वाटतील. सकाळी जेव्हा मंदिरातून भजनाचा आवाज येतो, तेव्हा मनाला शांती मिळते. ‘देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान, कितना बदल गया इंसान’ यांसारखी गाणी माणुसकी आणि समाजाला जोडण्याचा संदेश देतात. (अजानमधून कोणता संदेश दिला जातो ? हेही शिया धर्मगुरूंनी सांगायला हवे ! – संपादक)

संपादकीय भूमिका

असे आहे, तर नमाजाच्या वेळी आरतीचा आवाज ऐकल्यावर किंवा मशिदीसमोरून हिंदूंची धार्मिक मिरवणूक गेल्यावर त्यांच्यावर आक्रमणे का केली जातात ?

संपादकीय भूमिका

अशी उपाययोजना संपूर्ण देशात का केली जात नाही ?