रस्त्यावरील नमाजपठणावरून उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मुसलमानांना थेट सल्ला
‘संवादाने ऐकले, तर संवादाने... नाहीतर...’ अशी चेतावणीही दिली !

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – रस्ते चालण्यासाठी आहेत. रस्ता अडवण्याचा अधिकार कुणालाही नाही. तुमच्या घरात रहायला किंवा नमाजपठणासाठी जागा नसेल, तर लोकसंख्या नियंत्रित करा. जर सामर्थ्य नसेल, तर लोकसंख्या का वाढवत आहात?, अशा शब्दांत उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुसलमानांना रस्त्यावर नमाजपठणावरून सल्ला दिला.
नमाज पढ़नी है, आप शिफ्ट में पढ़िए…
प्यार से मानेंगे ठीक है, नहीं मानेंगे तो दूसरा तरीका अपनाएंगे… pic.twitter.com/zDoz6YiqTZ
— Yogi Adityanath (@myogiadityanath) May 18, 2026
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की,
१. लोक मला विचारतात, ‘तुमच्या उत्तरप्रदेशात खरेच रस्त्यावर नमाजपठण होत नाही का ?’ मी सांगतो, ‘मुळीच होत नाही.’
२. रस्ते चालण्यासाठी आहेत कि कुणीही येऊन तमाशा करण्यासाठी ? रस्ता अडवण्याचा काय अधिकार आहे ? ज्याचे जे प्रार्थनास्थळ असेल तिथे जाऊन त्याने ते करावे. त्यांनी (मुसलमानांनी) विचारले ‘हे कसे होईल ?, आमची संख्या अधिक आहे ?’
🚨 “No Space for Namaz at Home? Then Reduce Your Population!” – Yogi Adityanath 🔥
🛑 Uttar Pradesh CM gave a blunt message regarding Namaz being offered on roads.
⚠️ He also warned:
“Those who understand through dialogue will be dealt with through dialogue… otherwise…”… pic.twitter.com/S5RcRKOXXO— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 18, 2026
३. त्यावर आम्ही सांगितले की, ‘नमाजपठण आवश्यक असेल, तर तुम्ही शिफ्टमध्ये (पाळ्यांमध्ये) पठण करा, आम्ही त्याला रोखणार नाही; पण रस्त्यावर नाही. रस्ते चालण्यासाठी आहेत. आम्ही रस्ते बाधित होऊ देणार नाही. सरकारचा नियम सर्वांना समान लागू होतो.
४. आम्ही सर्वांना सांगितले आहे की, रस्त्यांवर अराजकता चालू देणार नाही. प्रेमाने ऐकले तर ठीक आहे, नाहीतर दुसरा मार्ग अवलंबला जाईल. आमचे काम संवाद साधणे आहे. तुम्ही संवादाने ऐकले तर संवादाने… नाहीतर संघर्षही पाहून घ्या. बरेलीमध्ये लोकांनी प्रयत्न करून पाहिला, त्यांना शक्ती दिसली आहे. म्हणूनच सरकार संपूर्ण व्यवस्थेला नियमांशी जोडू इच्छिते.
काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !
शिर्डी येथे ७०० किलो भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाचे पेढे जप्त !
Ram Mandir Donation Case : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी अंततः गुन्हा नोंद : २ जणांना अटक
कोंढवा (पुणे) येथील प्रदूषणकारी पशूवधगृह बंद करून अन्यत्र स्थलांतरित करा !
‘महा-एआय मॉडेल’द्वारे माहिती-आधारित प्रशासन उभारण्याच्या दिशेने शासनाचे महत्त्वाचे पाऊल ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
आपत्ती निवारणासाठी संबंधित विभागांनी सतर्क रहावे ! – पालकमंत्री डॉ. उदय सामंत