सर्वत्र टीका झाल्यावर विषय कार्यालयात प्रविष्ट !

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असतांनाही स्थायी समितीचे अध्यक्ष, सभागृह नेते आणि विरोधी पक्षनेते यांच्या सुरक्षेसाठी २ वर्षांसाठी ७५ लाख रुपये खर्च करण्याच्या प्रस्तावावर टीका झाल्याने हा विषय दप्तरी दाखल केला. नेत्यांच्या मागणीनुसार त्यांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ मर्यादित (‘मेस्को’) कडून २ वर्षांसाठी ९ सुरक्षारक्षक घेणार होते. एका सुरक्षारक्षकाचे दरमहा ३४ सहस्र ६५० रुपये वेतनाप्रमाणे ७४ लाख ८५ सहस्र ४०० रुपये एकूण खर्च होणार होता. याला होणारा विरोध पाहून ‘मेस्को’चे सुरक्षारक्षक नेमण्याचा विषय दप्तरी दाखल केल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे यांनी सांगितले.
अझरबैजानची राजधानी बाकू येथे १७ ते २२ मे या कालावधीत संमेलन होणार आहे. या संमेलनाला महापौर रवि लांडगे जाणार होते; मात्र त्यांनी हा दौरा रहित केला.
वाहन किंमत, देखभाल दुरुस्ती, इंधन, वाहनचालकांचे वेतन आणि इतर दरामध्ये वाढ झाल्याने महापालिकेचे पदाधिकारी आणि अधिकारी यांसाठी वाहन खर्च प्रतिपूर्तीची रक्कम दरमहा ५० सहस्र रुपये करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने मान्यतेसाठी सर्वसाधारण सभेकडे पाठवला होता; मात्र त्यालाही विरोध झाल्याने हा प्रस्तावही दप्तरी दाखल करणार असल्याचे महापौर रवि लांडगे यांनी सांगितले.
एका व्यक्तीसाठी महिन्याला ५० सहस्र रुपये म्हणजे एक मोटार महिन्याला ९ सहस्र किलोमीटर धावू शकेल. या हिशोबाने विचार केला, तर अधिकारी दररोज ३०० किलोमीटरचा प्रवास करतात का ? असा प्रश्न माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी उपस्थित केला.
पुण्यातील अत्यंत ‘ऐतिहासिक’ वारसा असलेला शून्य मैलाचा दगड आणि परिसराची दुरवस्था !
ठाणे येथे संरक्षण भिंत कोसळून ७ रिक्शांसह दुचाकीची हानी
खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात ठाणे येथे पत्रकारांचे आंदोलन
प्रशासकीय, तसेच लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी लवकरच राज्यात ८८ नवीन महसूल कार्यालये ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
अन्वेषणासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्याचे तालिका अध्यक्षांचे निर्देश !
देहू ते आळंदी पालखी मार्ग ‘संतभूमी’ म्हणून घोषित करा ! – अभय टिळक, माजी मुख्य विश्वस्त, आळंदी देवस्थान