
सोलापूर – केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पुढील ३ वर्षांत सोलापूर जिल्ह्यात १ लाख कोटी रुपयांच्या निधीतून रस्ते उभारण्यात येणार असल्याची घोषणा केली. अक्कलकोट येथे २ सहस्र ७८४ कोटी रुपयांच्या ६ महामार्ग प्रकल्पांचे डिजिटल भूमीपूजन करण्यात आले.
सूरत–चेन्नई महामार्गामुळे सोलापूर जिल्हा देशाचे मालवाहतूक आणि वितरण केंद्र (लॉजिस्टिक हब) बनेल, तसेच सोलापूर रिंग रोडसाठी ५५० कोटी रुपयांचा निधी संमत करण्यात आल्याची माहिती गडकरी यांनी दिली. या प्रकल्पांमुळे वाहतूक व्यवस्था मजबूत होऊन नागरिकांना सुरक्षित आणि जलद प्रवासाची सुविधा मिळणार आहे.
या वेळी कर्नाटक राज्य नियोजन आणि धोरण आयोगाचे उपाध्यक्ष बी.आर्. पाटील, सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, भाजपच्या राज्यसभा खासदार ज्योती वाघमारे, काँग्रेसच्या सोलापूर लोकसभा खासदार प्रणिती शिंदे, भाजपचे आमदार सुभाष देशमुख, भाजप आमदार विजयकुमार देशमुख, भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी, भाजप आमदार समाधान आवताडे, भाजप आमदार देवेंद्र कोठे, महायुती समर्थक आमदार राजू खरे, महापौर विनायक कोंड्याल, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सचिव एस्.जी. शेलार, राष्ट्रीय महामार्ग विभागीय अधिकारी प्रशांत फेगडे आणि तांत्रिक सल्लागार संजय जयस्वाल आदी उपस्थित होते.
‘श्री मोरया गोसावी मंदिर’ परिसरातील विक्रेत्यांवर कायमस्वरूपी कारवाई करावी !
पुणे येथील ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’मधील वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून अभियंत्याची आत्महत्या !
झाडांच्या संवर्धनात निष्काळजीपणा केल्यास भावी पिढीसाठी पुष्कळ रुग्णालये बांधावी लागतील !
सांगलीसह राज्यातील १२ बाजार समित्यांना ‘राष्ट्रीय बाजारपेठे’चा दर्जा !
शहरी आणि ग्रामीण भागांतील युवकांचे प्रश्न सोडवले जातील ! – अभिजित दीपके, कॉकरोच जनता पक्ष
वीजदेयकांविषयीचा प्रश्न सुटेपर्यंत स्मार्टमीटर बसवणे स्थगित ! – मुख्यमंत्री प्रमोद सावंत