
सांगली – पश्चिम महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कवठेमहांकाळ तालुक्यातील आरेवाडी येथील ‘श्री बिरोबा देवस्थाना’चा कायापालट होणार आहे. ‘प्रादेशिक पर्यटन विकास योजने’अंतर्गत १४९ कोटी ७५ लाख रुपये खर्चाच्या सुधारित बृहत विकास आराखड्यास जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.
आरेवाडी येथील बिरोबा देवस्थान हे ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्र असून येथे यात्राकाळात दीड ते २ लाख भाविक दर्शनासाठी येतात. भाविकांच्या वाढत्या संख्येचा विचार करून हा आराखडा सिद्ध करण्यात आला आहे. सुधारित आराखड्यात सामान्य सुविधा केंद्र, प्रशासकीय इमारत आणि भाविकांच्या निवासासाठी व्यवस्था केली जाईल. मुख्य मंदिराची दुरुस्ती आणि अंतर्गत सुशोभिकरण करण्यात येईल.
अंतर्गत आणि बाह्य विद्युतीकरण, जलपुरवठा प्रणाली, सांडपाणी व्यवस्थापन आणि अग्नीशमन यंत्रणा कार्यान्वित केली जाईल. रस्ता बांधकाम, आर्.सी.सी. संरक्षक भिंत, वाहनतळ आणि पावसाचे पाणी संकलित करण्याची (रेन वॉटर हार्वेस्टिंग) व्यवस्था केली जाणार आहे. जिल्हास्तरीय समितीने मान्यता केलेला हा आराखडा आता पुढील मान्यतेसाठी राज्यशासनाकडे पाठवण्यात येणार आहे. देवस्थानाच्या विकासासाठी वर्ष २०१० पासून आतापर्यंत ८ कोटी रुपयांची कामे पूर्ण झाली असून वर्ष २०२४-२५ या वर्षातही ३ कोटी ९८ लाख रुपयांची कामे संमत आहेत.
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित
आडाळी ‘एम्.आय.डी.सी.’मध्ये अवैधरित्या झालेल्या उत्खननाची उच्चस्तरीय चौकशी चालू !
मासेमारांना खोल समुद्रातील संपर्कासाठी ‘सॅटेलाईट फोन’ उपलब्ध होण्यासाठी सरकारचे प्रयत्न !
मोशी (पुणे) कचरा दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी होणार !