१४ जूनला स्थळाची घोषणा

पुणे – महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने पुणे येथे आयोजित करण्यात येणार्या १०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्थळाची १४ जून या दिवशी घोषणा होणार आहे. या संमेलनासाठी सहसंयोजक म्हणून लोकहितवादी यांनी स्थापन केलेली पुणे नगर वाचन मंदिर आणि पुणे पुस्तक महोत्सव या २ संस्था इच्छुक आहेत. त्यांपैकी एका संस्थेची निवडही १४ जूनला निश्चित केली जाणार आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती साहित्य महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी पत्रकार परिषदेत दिली. साहित्य महामंडळाच्या प्रमुख कार्यवाह स्वाती महाळंक आणि कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर या वेळी उपस्थित होते. साहित्य महामंडळाचे उपाध्यक्ष आणि प्रभारी अध्यक्ष रे. गुरय्या स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सोमण, महाळंक आणि निफाडकर यांनी साहित्य महामंडळाचे पदाधिकारी म्हणून सूत्रे स्वीकारली. स्वामी यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने त्यांच्या जागी मध्यप्रदेश साहित्य संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम सप्रे (भोपाळ) यांची साहित्य महामंडळाच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
शाळांमध्ये अतिरेकी आणि राष्ट्रविरोधी विचारसरणीला थारा नसावा ! – नितीन फळदेसाई
मुंबईत ‘डबेवाले’ बांधवांच्या सन्मानार्थ वैद्यकीय पडताळणी आणि पाद्यपूजा !
‘स्मार्ट मीटर’विषयीच्या अफवांवर विश्वास न ठेवता ग्राहकांनी सहकार्य करावे ! – महावितरणचे आवाहन
भारतात अवैधरित्या वास्तव्यास असलेला अमेरिकेचा माजी सैनिक कह्यात
गोव्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील सुधारणांसाठी १८० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत
खड्डे तक्रारीचे ‘पी.एम्.सी. रोड मित्र’ अॅप ४ महिन्यांपासून बंद !