
प्रयागराज (उत्तरप्रदेश) – अलाहाबाद उच्च न्यायालयाने एका मुसलमान प्राध्यापकाचा सनातन धर्मात प्रवेश करण्याचा अर्ज फेटाण्याच्या प्रयागराजच्या अतिरिक्त जिल्हा दंडाधिकार्यांच्या भूमिकेवर तीव्र अप्रसन्नता व्यक्त केली. अनिल पंडित (पूर्वीचे महंमद अहसान) यांनी स्वतःच्या इच्छेने सनातन धर्मात प्रवेश केला होता आणि ‘उत्तरप्रदेश बेकायदेशीर धर्मपरिवर्तन प्रतिबंध कायदा २०२१’ अंतर्गत याला औपचारिक मान्यता मिळवण्यासाठी अर्ज केला होता; मात्र अतिरिक्त जिल्हा दंडाधिकार्यांनी अर्जावर निर्णय घेण्यापूर्वी वारंवार पोलीस चौकशी केली आणि नंतर त्यांचा अर्ज फेटाळून लावला. सुनावणीच्या वेळी न्यायालयासमोर हे तथ्यही आले की, या तरुणाविरुद्ध त्याच्या सासर्याने फौजदारी गुन्हा नोंदवला होता. सध्या उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अजित कुमार आणि न्यायमूर्ती इंद्रजीत शुक्ला यांच्या खंडपिठाने प्रयागराजच्या अतिरिक्त जिल्हा दंडाधिकार्यांच्या आदेशाला स्थगिती दिली आहे.
१. महंमद अहसान यांनी वर्ष २०२२ मध्ये आर्य समाज मंदिरात सनातन धर्म स्वीकारला होता आणि त्यांचे नाव ‘अनिल पंडित’ असे ठेवण्यात आले होते. त्यांनी न्यायालयाला सांगितले की, शालेय जीवनापासूनच त्यांचा कल सनातन धर्म, हिंदु संस्कृती आणि परंपरा यांच्याकडे होता. त्यांच्या कुटुंबात कधीही नमाजपठणाची परंपरा नव्हती.
२. अलाहाबाद विद्यापिठाच्या इंग्रजी विभागात पी.एच्डी. करत असतांना त्यांची भेट अपर्णा वाजपेयी यांच्याशी झाली आणि नंतर दोघांनी प्रेमविवाह केला. अपर्णा वाजपेयी यांनी न्यायालयाला सांगितले की, त्यांनी स्वतःच्या इच्छेने हिंदु परंपरांनुसार अनिल पंडित यांच्याशी विवाह केला; परंतु त्यांचे वडील या विवाहाच्या विरोधात होते. सध्या त्या ७ महिन्यांच्या गरोदर आहेत.
३. अपर्णा यांच्या वडिलांनी अनिल यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर या प्रकरणात पोलिसांनी म्हटले होते की, याचिकाकर्त्यावर धर्मांतरासाठी कोणताही दबाव आणला गेला नव्हता किंवा त्याला कोणत्याही अयोग्य मार्गाने प्रभावित करून सनातन धर्म स्वीकारण्यास भाग पाडले गेले नव्हते.
काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !
Ram Mandir Donation Case : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी अंततः गुन्हा नोंद : २ जणांना अटक
आपत्ती निवारणासाठी संबंधित विभागांनी सतर्क रहावे ! – पालकमंत्री डॉ. उदय सामंत
‘राजापूर रोड’ रेल्वेस्थानकात उद्वाहनाचे (लिफ्टचे) काम चालू
अवैध प्रवासी वाहतूक करणार्या मालवाहू वाहनांचे परवाने कायमचे रहित करणार ! – प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री
‘लव्ह जिहाद’च्या आंतरराष्ट्रीय षड्यंत्राच्या प्रकरणी १४ जणांविरुद्ध दोषारोपपत्र सादर !