
मुंबई – राज्य परिवहन महामंडळाचे वर्ष २०३५ पर्यंत पूर्णपणे विद्युतीकरण करण्याचे उद्दिष्ट परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी घोषित केले आहे. याअंतर्गत राज्यभरात सार्वजनिक खासगी भागीदारी तत्त्वावर किमान २०० विद्युत्प्रभारण केंद्रे उभारली जाणार आहेत. भविष्यातील २० सहस्र ई-बसगाड्यांची आवश्यकता ओळखून ही केंद्रे महामंडळाच्या मोकळ्या जागांवर विकसित केली जातील. प्रकल्पांतर्गत विकासकांना जागा भाड्याने दिली जाईल. तेथे राज्य परिवहन महामंडळ बसगाड्यांसह खासगी वाहनांच्याही विद्युत् प्रभारणाची सोय असेल. यामुळे महामंडळाला पायाभूत सुविधांवर खर्च करावा लागणार नाही. भाडे आणि लाभ यांतून महसूल मिळेल.
गडचिरोलीतील खाण प्रकल्प रहित करावेत ! – आदित्य ठाकरे, नेते, ठाकरे गट
नागपूर येथे श्री दुर्गादेवीच्या मूर्तीवरील सोन्याची साखळी चोरणार्या ३ धर्मांधांना अटक !
विधान परिषदेमध्ये महायुतीचे ५ उमेदवार बिनविरोध विजयी !
बसस्थानके आणि बसगाड्या यांची प्रत्येक ४ घंट्यांनी स्वच्छता होणार ! – परिवहनमंत्री
गोव्यात मौसमी पावसाचे आगमन
दूध आणि दूधजन्य पदार्थांतील भेसळीविरुद्ध प्राधान्याने कारवाई करणार !