बंगालचे मुख्यमंत्री शुभेंदु अधिकारी यांचा पोलिसांना आदेश
कोलकाता (बंगाल) – बंगालमधील भाजप सरकारचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री शुभेंदु अधिकारी यांनी प्रशासकीय बैठकीत पोलीस अधिकार्यांना स्पष्टपणे सांगितले आहे की, कोणत्याही धार्मिक स्थळावरील भोंग्यांचा आवाज निर्धारित ध्वनीमर्यादेच्या बाहेर जाता कामा नये. या नियमाची कार्यवाही करण्यासाठी सक्ती किंवा बळजोरी न करता संवाद आणि समजावण्याचा मार्ग अवलंबण्यास सांगण्यात आले आहे. धार्मिक स्वातंत्र्याचा मान राखणे आवश्यक आहे; परंतु त्याचबरोबर सामान्य लोकांची सोय आणि शांतताही तितकीच महत्त्वाची आहे. त्यामुळे भोंग्यांचा आवाज संबंधित धार्मिक परिसराच्या बाहेर अत्यधिक स्तरापर्यंत पोचणार नाही, याची निश्चिती केली जावी.
📢 Bengal CM Suvendu Adhikari directs police to strictly regulate loudspeaker volume at places of worship across the state.
Separate arrangements will be made during festivals like Durga Puja, Eid, and other major celebrations.#SoundPollution
PC: @thecord_in pic.twitter.com/YXmluCqP7Z— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 12, 2026
सणासुदीसाठी वेगळी व्यवस्था !
बैठकीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की दुर्गापूजा, ईद किंवा इतर समुदायांच्या मोठ्या सणांच्या वेळी विशेष परिस्थिती असते. अशा वेळी त्या सणांकडे वेगळ्या दृष्टीकोनातून पाहिले जाईल.

गोव्यातून सुमारे ५ सहस्र वारकर्यांचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करू ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
शासनाची सर्व ओळखपत्रे भारतीय नागरिकत्वाचा पुरावा मानावा ! – प्रा. नागनाथ स्वामी, ‘जागृत ग्राहक राजा’ संस्था
जोधपूर (राजस्थान) येथील श्री सच्चियायमातेला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी केली प्रार्थना !
महाराष्ट्रात आता शासकीय निर्णय, आदेश आदींवर डिजिटल स्वाक्षरी असणार !
वारीतील दुर्घटनाग्रस्त वारकर्यांसाठी शासन राबवणार ‘विठ्ठल-रखुमाई वारकरी योजना’ !