बंगालचे नवे मुख्यमंत्री शुभेंदु अधिकारी यांच्या मंत्रीमंडळाच्या पहिल्या बैठकीत ५ मोठे निर्णय
‘आयुष्मान भारत योजना’ लागू होणार
भाजपच्या हुतात्मा ३२१ कार्यकर्त्यांच्या कुटुंबाचे सर्व दायित्व घेणार
‘भारतीय न्याय संहिता’ लागू होणार

कोलकाता (बंगाल)- बंगालचे नवे मुख्यमंत्री शुभेंदु अधिकारी यांनी ११ मे या दिवशी मंत्रीमंडळाची पहिली बैठक घेतली. यामध्ये ५ मोठे निर्णय घेण्यात आले. यात संपूर्ण राज्यात ‘आयुष्मान भारत योजना’ (गरीब आणि दुर्बल कुटुंबांना प्रतीवर्ष ५ लाख रुपयांपर्यंत विनामूल्य उपचार) लागू केली जाईल. नियमांनुसार आय.पी.एस्. (इंडियन पोलीस सर्व्हिस – भारतीय पोलीस सेवा) आणि आय.ए.एस्. (इंडियन ॲडमिनिस्ट्रेशन सर्व्हिस – भारतीय प्रशासकीय सेवा) अधिकार्यांना केंद्रीय प्रशिक्षणात सहभागी होण्याची अनुमती देण्यात येईल. राज्यात ‘भारतीय न्याय संहिता’ लागू होईल. सीमा सुरक्षा दलाला सीमेवील भागातील भूमी हस्तांतरित करण्यात येईल. ४५ दिवसांच्या आता ही भूमी देण्यात येईल. याद्वारे सीमेवर कुंपण घालण्याचे काम होईल. बंगालमध्ये ज्या ३२१ भाजप कार्यकर्त्यांनी जीव गमावला, त्यांच्या कुटुंबांचे पूर्ण दायित्व सरकार घेईल. (ममता बॅनर्जी सरकारच्या काळात ३०० हून अधिक कार्यकर्त्यांची राजकीय हिंसाचारात हत्या झाल्याचा भाजपचा दावा आहे) हे ५ निर्णय बैठकीत घेण्यात आले.

🚩 Major Decisions in the First Cabinet Meeting of Bengal’s New Chief Minister, Suvendu Adhikari 🇮🇳
– Land to be provided to the BSF for strengthening border fencing 🛡️
– ‘Ayushman Bharat Yojana’ to be implemented for the people 🏥
– Full responsibility to be taken for the… pic.twitter.com/VYKzI6iCQp
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 11, 2026
बैठकीबद्दल अधिक माहिती देतांना मुख्यमंत्री शुभेंदु अधिकारी म्हणाले की, बंगालच्या सीमावर्ती जिल्ह्यांमधील सतत पालटणारी लोकसंख्या लक्षात घेता मंत्रीमंडळाने सीमेवर कुंपण घालण्यासाठी सीमा सुरक्षा दलाला आवश्यक भूमी सोपवण्याच्या प्रक्रियेला संमती दिली आहे. मुख्य सचिव आणि राज्याच्या भूमी अन् भू-राजस्व विभागाच्या सचिवांना पुढील ४५ दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितले आहे.
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !
Rohingya Sink : रोहिंग्या निर्वासितांच्या २ नौका बुडाल्याने ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती
Puri Rath Yatra Stampede : पुरी रथयात्रेत चेंगराचेंगरी : एकाचा मृत्यू, तर १०० हून अधिक भाविक घायाळ
इस्लामिक स्टेटला साहाय्य करणारा राकिब अंसारी याला ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा