
पुणे – महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एम्.आय.डी.सी.), भोसरी परिसरातील एका गृहनिर्माण प्रकल्पात ८ मे या दिवशी कामाच्या पहिल्याच दिवशी सुरक्षारक्षक दिनेश चौधरीने ४ अल्पवयीन मुलींना ‘पाण्याची टाकी दाखवतो’, असे सांगत सातव्या मजल्यावर नेले. तिथे गेल्यावर आरोपीने मुलींवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, तसेच ‘ही घटना कुणाला सांगितली, तर तुम्हाला मारून टाकेन’, अशी धमकीही मुलींना दिली; मात्र १० वर्षांच्या मुलीने घरी येताच घडलेली सर्व घटना आईला सांगितली. मुलीच्या पालकांनी तातडीने पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सुरक्षारक्षकाला अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जामदार यांनी दिली. (कायद्याचा धाक संपल्याने छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात मुली आणि महिला यांच्यावरील अत्याचार वाढत आहेत. – संपादक)
उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार्या आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांचे स्थानांतर
नक्षली कारवायांमुळे उपेक्षित गडचिरोलीतील २२ ठिकाणी होणार ‘आपले सरकार सेवा केंद्रे’
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)
मोशी दुर्घटनेप्रकरणी मुख्य आणि कार्यकारी अभियंते निलंबित !
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !