‘जय श्रीराम’च्या जयघोषाने करवीरनगरीत रामराज्याचा जागर : विविध संप्रदाय, आध्यात्मिक संस्था यांचा सहभाग
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा ९ मे या दिवशी झाला तिथीनुसार ८४ वा वाढदिवस

कोल्हापूर, १० मे (वार्ता.) – सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने संस्थेच्या वतीने देशभरात ‘रामराज्य निर्माण अभियान’ राबवण्यात येत आहे. त्या निमित्ताने साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या आणि श्री महालक्ष्मीदेवीच्या कृपेने पावन झालेल्या करवीरनगरीत १० मे या दिवशी भव्य अशा ‘हिंदु एकता दिंडी’चे आयोजन करण्यात आले होते. या दिंडीच्या माध्यमातून रामराज्य, म्हणजेच हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे स्फुलिंग चेतवले गेले. ही दिंडी मिरजकर तिकटी, खरी कॉर्नर, महाद्वार रोड येथून जाऊन छत्रपती शिवाजी महाराज पुतळा (शिवतीर्थ) येथे तिची सांगता झाली. या दिंडीसाठी सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांची वंदनीय उपस्थिती लाभली.
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित
आडाळी ‘एम्.आय.डी.सी.’मध्ये अवैधरित्या झालेल्या उत्खननाची उच्चस्तरीय चौकशी चालू !
मासेमारांना खोल समुद्रातील संपर्कासाठी ‘सॅटेलाईट फोन’ उपलब्ध होण्यासाठी सरकारचे प्रयत्न !