Rudrapur Muslims Encroachment : रुद्रपूर (उत्तराखंड) येथे मुसलमानाकडून सरकारी भूमीवर अतिक्रमण करून घर बांधले !

  • घरातच वडिलांचे शव पुरले आणि थडगे उभारले !

  • प्रशासन करणार कारवाई !

रुद्रपूर (उत्तराखंड) – येथे सरकारी भूमीवर अब्बास याने अतिक्रमण करून घर बांधले आणि वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचा मृतदेह तेथेच पुरला अन् त्यांचे तेथे थडगे बांधले.

महापौर विकास शर्मा, अतिरिक्त जिल्हाधिकारी पंकज उपाध्याय आणि महानगरपालिका आयुक्त शिप्रा जोशी-पांडे यांच्यासह महानगरपालिका अन् प्रशासन यांचे पथक परिसराचे निरीक्षण करत होते. या वेळी स्थानिक लोकांनी या थडग्याच्या संदर्भात त्यांच्याकडे तक्रार केली. यानंतर प्रशासनाने तात्काळ ही वास्तू जप्त केली. ‘या प्रकरणाची चौकशी करून संबंधिताच्या विरोधात गुन्हा नोंदवला जाईल’, असे अतिरिक्त जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले, तर महापौरांनी ‘थगडे पाडले जाईल’, असे सांगितले.

संपादकीय भूमिका

देशभरात बहुतांश सरकारी भूमीवर अतिक्रमण केले जाते आणि बहुतांश वेळा प्रशासन झोपलेले असते !