
पणजी, ८ मे (वार्ता.) – गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात ११ मे २०२६ पासून रुग्णालयाच्या आणखी ७ विभागांमध्ये ऑनलाईन बाह्यरुग्ण विभाग आरक्षण सुविधा चालू करण्यात येणार आहे. सध्या राज्यातील या प्रमुख वैद्यकीय संस्थेच्या अनुमाने १३ विभागांमध्ये ऑनलाईन बाह्यरुग्ण विभाग आरक्षण सेवा चालू आहे. नवीन विभागांमध्ये बालरोग एंडोक्राइनोलॉजी (अंतःस्रावशास्त्र), प्लास्टिक सर्जरी (पुनर्निर्माण शस्त्रक्रिया), न्यूरोसर्जरी (मज्जासंस्थेच्या आजारावरील शस्त्रक्रिया), कार्डिओव्हॅस्क्युलर थोरॅसिक सर्जरी (हृदय, रक्तवाहिन्या आणि छातीतील अवयवांची शस्त्रक्रिया) जेरिॲट्रीक मेडिसीन (जराचिकित्सा), बालरोग शस्त्रक्रिया आणि नेफ्रोलॉजी (मूत्रपिंड विज्ञान) या विभागांचा समावेश आहे. या प्रत्येक विभागासाठी प्रतिदिन ५० ऑनलाईन जागा उपलब्ध असतील, अशी माहिती अधिकार्यांनी दिली, तसेच गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या https://www.gmcgoa.edu.in/ आणि https://www.gmcgoa.edu.in/ या संकेतस्थळांद्वारे पुढील ७ दिवसांपर्यंत भेट घेण्यासाठी आरक्षण खुले राहील. याखेरीज बाह्यरुग्ण विभागांसाठी भेट घेण्यासाठी ऑनलाईन सुविधेसमवेत सध्याची ऑफलाईन रांग पद्धत चालू राहील.
थोडक्यात महत्त्वाचे : ०६.०६.२०२६
‘श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसर विकास आराखड्या’तील १३६ जागांचे सर्वेक्षण पूर्ण ! – डॉ. विजय राठोड, जिल्हाधिकारी, कोल्हापूर
हिंजवडी ‘आयटी पार्क’ मधील ‘थिंकटेक इंडिया’ आस्थापन रातोरात बंद !
आरे परिसरातील ८० एकर जागेत ५ लाख वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ !
श्री महालक्ष्मीदेवी मंदिरासह परिसरातील गड-दुर्ग यांना एकत्र करून ‘टुरिस्ट सर्किट’ करणार ! – शंभूराज देसाई, खनिजकर्ममंत्री
महिला पर्यटकांचे व्हिडिओ काढणार्याला अटक