‘मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी’ उपक्रमाला शासनाची मान्यता !

मुंबई – ‘मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी’ उपक्रमाअंतर्गत राज्यातील विज्ञान प्रदर्शनांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणार्या विद्यार्थ्यांना इस्रो आणि अमेरिकेतील नासा केंद्राला भेट देण्याची संधी मिळणार, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिली. यासाठी ३.३० कोटी रुपये खर्च करणार आहे.
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन, तर्कशुद्ध विचारसरणी आणि समस्या सोडवण्याची क्षमता विकसित करण्यावर भर देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांमधील संशोधनवृत्ती आणि नवोपक्रमशीलतेला प्रोत्साहन देऊन त्यांना भविष्यासाठी सक्षम बनवण्याच्या उद्देशाने राज्यशासनाने ‘मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम चालू करण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना विज्ञान क्षेत्रातील प्रगत संशोधन संस्थांचा प्रत्यक्ष अनुभव घेता येणार आहे. त्यांच्या वैज्ञानिक जिज्ञासेला चालना मिळून भविष्यातील संशोधक घडण्यास साहाय्य होणार असल्याचा विश्वास शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केला आहे.
‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०’च्या अनुषंगाने विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान यांविषयी आवड निर्माण व्हावी, तसेच अनुभवाधारित शिक्षणाला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. तालुकास्तरावर विज्ञान प्रदर्शनात प्रथम येणार्या एकूण २ सहस्र १४८ विद्यार्थ्यांना जवळच्या विज्ञान केंद्रांना, जिल्हास्तरावर निवड झालेल्या १८० विद्यार्थ्यांना बेंगळुरू येथील इस्रो केंद्राला आणि राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात उत्कृष्ट ५१ विद्यार्थ्यांना अमेरिकेतील नासा केंद्राला भेट देण्याची विशेष संधी देण्यात येणार आहे.
Nagpur Police : वाहतूक पोलिसांना बंदूक बाळगणे बंधनकारक !
Vistara_Airlines : विस्तारा एअरलाईन्सला ग्राहक आयोगाकडून १ लाख रुपयांचा दंड
JeM Terrorist Arrested : गुजरातमध्ये जैश-ए-महंमदशी संबंधित ५ आतंकवाद्यांना अटक
AL Falah University : हरियाणातील अल्-फलाह वैद्यकीय महाविद्यालयाचा विद्यार्थी अदीदशाह याला गांजासह अटक !
Karnataka Fake Currency Racket : टोळीकडून बनावट भारतीय चलनी नोटांची छपाई केली जात असल्याचे उघड !
माफियांना नरकात किंवा कारागृहातच पाठवणार ! – CM Yogi Adityanath