पालघर जिल्ह्यात अघोरी पूजेच्या नावाखाली अल्पवयीन मुलीवर अत्याचार; भोंदूला अटक

अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराची मालिका चालूच !

पालघर – जिल्ह्यातील कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका कुटुंबातील मुलीचा मासिक पाळीनंतरही रक्तस्राव चालू असल्याने चिंतेत असलेले कुटुंब तिला एका भोंदूकडे घेऊन गेले. या भोंदूने त्यांना अघोरी पूजा आणि गावठी औषध देण्याचे आमीष दाखवत त्याने कुटुंबाला ३ मे या दिवशी भेटायला बोलावले. ४ मेच्या मध्यरात्री चरी येथील स्मशानभूमीजवळ पूजा करण्यात आली. याच वेळी आरोपीने १३ वर्षीय मुलीला बाजूला नेऊन तिच्यावर बलात्कार केला. घटनेनंतर याविषयी कुणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकीही दिली. मुलीने धाडस दाखवत कुटुंबाला माहिती दिल्यानंतर प्रकरण उघड झाले. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी शिवराम परश सावर याला ५ मे या दिवशी पहाटे अटक केली. पुढील अन्वेषण पोलीस करत आहेत.

या चालू असलेल्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रात प्रतिदिन अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराची वृत्ते येत आहेत.

संपादकीय भूमिका

  • आरोपीला सार्वजनिकरित्या कठोर शिक्षा झाल्याविना असे अत्याचार थांबणार नाहीत !
  • मुली आणि महिला यांच्यावरील अत्याचार थांबण्यासाठी नीतीमान प्रजा असलेले हिंदु राष्ट्रच हवे !