२० टक्के प्लास्टर ऑफ पॅरिस असलेल्या चिकणमातीच्या श्री गणेशमूर्तींना संमती देण्याचा प्रदूषण नियंत्रण मंडळाचा सरकारला प्रस्ताव

पणजी, ६ मे (वार्ता.) – श्री गणेशमूर्ती विक्रेते आणि चित्रशाळांचे चालक यांच्यासाठी सरकारचे ऑनलाईन नोंदणी पोर्टल (संकेतस्थळ) ५ मेपासून कार्यान्वित करण्यात आले आहे. संबंधित विक्रेते आता त्यांची नोंदणी सुलभ पद्धतीने ऑनलाईन माध्यमातून करू शकणार आहेत. हे पोर्टल सर्व श्री गणेशमूर्ती विक्रेते आणि चित्रशाळा चालक यांच्यासाठी खुले करण्यात आले आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनवलेल्या श्री गणेशमूर्तींच्या विक्रीवर देखरेख ठेवण्यासाठी हे पोर्टल आहे.
वास्तविक प्लॉस्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींच्या विक्रीला राज्यात बंदी घालण्यात आली आहे; मात्र गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने चिकणमातीपासून बनवलेल्या आणि त्यामध्ये २० टक्के प्लास्टर ऑफ पॅरिसचे प्रमाण असलेल्या श्री गणेशमूर्तींना मान्यता देता येईल, असे म्हटले आहे. २७ फेब्रुवारी २०२६ या दिवशी मंडळाने सरकारला प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींवरील बंदी काही प्रमाणात शिथिल करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. मंडळाच्या मते चिकणमातीपासून बनवलेल्या आणि २० टक्के प्लास्टर ऑफ पॅरिस प्रमाण असलेल्या श्री गणेशमूर्तीं विश्लेषणानंतर अनुमती देण्यायोग्य असल्याचे आढळले आहे. चिकणमातीपासून बनवलेली, २० टक्के प्लास्टर ऑफ पॅरिसचे प्रमाण असलेली, तसेच जैविकरित्या विघटनशील आणि विषारी नसलेल्या रंगाने सिद्ध केलेल्या मूर्तींना संमती देता येईल, असे मंडळाचे म्हणणे आहे. सरकारच्या मते प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनवलेल्या श्री गणेशमूर्तींसाठी वापरण्यात येणारे कृत्रिम रंग हे विषारी असतात, तसेच प्लास्टर ऑफ पॅरिस हेही घातक आहे आणि यामुळे पाणी प्रदूषित होते. मंडळाच्या प्रस्तावानंतर सरकारने सप्टेंबरमध्ये होणार्या श्री गणेशचतुर्थीच्या काळात श्री गणेशमूर्ती विकणारे किंवा त्या आयात करणारे यांच्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाला श्री गणेशमूर्ती विक्रेते आणि चित्रशाळांचे चालक यांच्यासाठी एक ऑनलाईन पोर्टल सिद्ध करण्यास सांगितले.
पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी कशी कराल?
१. पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी प्रथम अधिकृत संकेतस्थळ goaocmms.nic.in यावर जाऊन मुख्य पानावरील ‘गणेश/चित्रशाळा आयडॉल व्हेंडर रजिस्ट्रेशन’ या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर ‘क्रिएट लॉगइन’ या पर्यायाद्वारे अर्जदाराचे नाव, भ्रमणभाष क्रमांक, जिल्हा, तालुका आणि गुप्त प्रश्न आणि त्याचे उत्तर भरून लॉगइन आयडी आणि पासवर्ड सिद्ध करावा लागतो.
२. सिद्ध केलेल्या आयडीद्वारे ‘गणेश आयडॉल लॉगइन’ निवडून संपूर्ण नोंदणी अर्ज भरावा.
ढवळी परिसरात बिबट्याचे आक्रमण
मळेवाड येथे बिबट्याच्या आक्रमणात वासराचा मृत्यू
गोव्यातील ५६ गावांच्या शहरीकरणाच्या अधिसूचनेला विरोध
अत्याचार केल्याप्रकरणी धर्मांधाला सश्रम कारावास आणि दंड !
आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज
पक्षातील एकही खासदार फुटणार नसल्याचा शरद पवार यांना विश्वास !