पनवेलमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘मत्स्यालय’ आणि ‘समुद्री सिंह मनोरंजन केंद्र’ उभारणार ! – नितेश राणे, मत्स्यव्यवसायमंत्री

नितेश राणे, मत्स्यव्यवसायमंत्री

पनवेल – येथील मत्स्य उपकेंद्रात ‘मत्स्यालय’ आणि ‘समुद्री सिंह मनोरंजन केंद्र’ हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रकल्प उभारण्यासाठी मत्स्यव्यवसायमंत्री नितेश राणे यांनी सविस्तर नियोजनाचे निर्देश दिले आहेत. आमदार विक्रांत पाटील यांनी मांडलेल्या प्रस्तावावर मंत्रालयातील बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

हा प्रकल्प १० एकर क्षेत्रावर साकारण्याचे प्रस्तावित असून, तो जागतिक दर्जाचा झाल्यास देश-विदेशातील पर्यटकांना आकर्षित करेल आणि पर्यटनाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास मंत्री राणे यांनी व्यक्त केला.

पनवेलमधील हे केंद्र समुद्रमुखाजवळ असल्याने सागरी जीवसृष्टीच्या संवर्धनासाठी ते अत्यंत योग्य ठिकाण आहे.