बेंगळुरू (कर्नाटक) – गोकर्णच्या श्री संस्थान श्री महाबळेश्वर मंदिराच्या आयकर थकबाकी प्रकरणांमध्ये मंदिर प्रशासनाला विजय मिळाला आहे. आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये १३ लाख रुपये आणि वर्ष २०१९-२० मध्ये ९० लाख रुपये कर थकबाकी भरण्याबाबत आयकर विभागाने दिलेल्या नोटिशीच्या संदर्भात मंदिराच्या बाजूने निकाल लागला आहे. याद्वारे कर थकबाकी शून्य असल्याचे आयकर विभागाच्या आयुक्तांनी त्यांच्या आदेशात निश्चित केले आहे. याआधी वर्ष २०१५-१६ या वर्षाच्या प्रकरणात १ कोटी ४२ लाख रुपयांच्या कर थकबाकी प्रकरणातही मंदिर प्रशासनाला विजय मिळाला होता आणि आता मंदिर प्रशासनाविरुद्धची सर्व आयकर प्रकरणे संपुष्टात आली आहेत.
विभागाने दिलेली नोटीस कर दायित्व निश्चित करण्यासाठी होती, यातून तेथे कोणताही गैरव्यवहार झाला होता, असे सूचित होत नाही. आता महाबळेश्वर मंदिराची कोणतीही कर थकबाकी नाही, असे आयकर विभागानेच निश्चित करून आदेश दिला आहे. इतकेच नव्हे, तर मंदिराच्या सध्याच्या प्रशासकीय मंडळाचे स्पष्टीकरण प्राप्तीकर विभागाने मान्य करणे, हा त्या वेळच्या श्री रामचंद्रापूर मठाच्या आदर्श प्रशासकीय व्यवस्थेचा विजय आहे, असे मठाच्या माध्यम विभागाने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

खांदेश्वर येथे रखडलेल्या कामांना गती देणार असल्याचे महापालिकेचे आश्वासन !
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पाईक असून मैदान सोडून जाणारा नाही !
मासेमारांना खोल समुद्रातील संपर्कासाठी ‘सॅटेलाईट फोन’ उपलब्ध होण्यासाठी सरकारचे प्रयत्न !
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क