
पणजी, ५ मे (वार्ता.) – गोव्यातील नगरपालिका निवडणुकीविषयी गोवा सरकारने प्रसिद्ध केलेल्या अध्यादेशाला मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठात आव्हान देण्यात आले आहे. या अध्यादेशाच्या वैधतेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करत २ याचिकाकर्त्यांनी स्वतंत्र याचिका उच्च न्यायालयात प्रविष्ट (दाखल) केल्या आहेत. न्यायालयाने याचिका प्रविष्ट करून घेतल्या आहेत आणि या प्रकरणी पुढील सुनावणी १० जून या दिवशी ठेवली आहे. यासंबंधी न्यायालयाने निवडणूक आयोग आणि गोवा सरकार यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले आहे.
याविषयी माहिती देतांना या प्रकरणातील एक याचिकादार ट्रोजन डिमेलो म्हणाले, ‘‘गोवा सरकारने नगरपालिका निवडणूक मुदतीत घेणे आवश्यक आहे. अध्यादेश काढून निवडणूक पुढे ढकलणे चुकीचे आहे. अनेक नगरपालिका मंडळांचा ५ वर्षांचा कार्यकाळ संपला आहे आणि यामुळे निवडणूक प्रक्रिया ठरलेल्या वेळेत होणे आवश्यक आहे. निवडणूक न झाल्याने स्वायत्त संस्थांच्या कार्यावर परिणाम होत आहे आणि हे लोकशाहीच्या तत्त्वाच्या विरोधात आहे.’’ या प्रकरणी शितेश मोरे यांनीही नगरपालिका निवडणुकीसंबंधीच्या अध्यादेशाला मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठात आव्हान दिले आहे.
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचे सखोल सर्वेक्षण करून उत्कृष्ट परिसंस्था निर्माण करा ! – मुख्यमंत्री
धर्मांधाकडून हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यासाठी वारंवार मानसिक छळ आणि धमक्या !
कर्नाटकात शाळांजवळ पिझ्झा-बर्गर यांच्या विक्रीवर लवकरच बंदी !
नांदणी मठाची ‘माधुरी’ हत्तीण परत आणण्याचे प्रयत्न अंतिम टप्प्यात ! – डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार
दोडामार्गमध्ये गायरान भूमीवर काळ्या दगडाच्या खाणीला ग्रामस्थांचा विरोध !
गोव्यात २४ जुलैपर्यंत मध्यम पावसाची शक्यता