
बोरिवली – येथील एका शॉपिंग सेंटरमध्ये २ तरुणींशी कर्मचार्यांनी उद्धट वर्तन केले. याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र निषेध नोंदवत संबंधित व्यवस्थापनाला जाब विचारला. मुंबईत व्यवसाय करतांना स्थानिक नागरिकांचा आणि विशेषतः महिलांचा सन्मान राखणे अनिवार्य असल्याचे मनसेकडून स्पष्ट करण्यात आले. कोणत्याही प्रांत किंवा भाषा यांच्या नावाखाली गैरवर्तन खपवून घेतले जाणार नाही, अशी चेतावणीही देण्यात आली. संबंधित व्यवस्थापनाकडून या प्रकरणात योग्य कारवाई करण्याची मागणी करण्यात आली असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कडक सूचना देण्यात आल्या आहेत.
डहाणू (जिल्हा पालघर) येथे होणार जगातील सर्वांत मोठ्या कृषी बाजाराची उभारणी !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित
आडाळी ‘एम्.आय.डी.सी.’मध्ये अवैधरित्या झालेल्या उत्खननाची उच्चस्तरीय चौकशी चालू !