गेल्याच आठवड्यात झाला होता गोळाबार !
(‘व्हाईट हाऊस’ म्हणजे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान आणि कार्यालय)

वॉशिंग्टन (अमेरिका) – गेल्याच आठवड्यात व्हाईट हाऊसमध्ये ‘करस्पाँडेंट्स डिनर’चा कार्यक्रम चालू असतांना सभागृहाबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर आता व्हाईट हाऊसच्या परिसरात पुन्हा गोळीबार झाला आहे. या गोळीबारात अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे.डी. व्हान्स यांच्या वाहनाचा ताफा थोडक्याच वाचला. गेल्या आठवड्यात झालेल्या गोळीबाराच्या घटनेच्या वेळीही तेथे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प स्वतः, तसेच व्हान्स उपस्थित होते.
Another shooting near the White House 🇺🇸 and JD Vance’s convoy reportedly had a narrow escape
Second shooting incident within a week raises concerns
Yet Donald Trump talks of taking on multiple countries when even security near his own residence seems questionable. https://t.co/S6LQnRIFQT pic.twitter.com/MjypW417Nm
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 5, 2026
या प्रकरणी पत्रकार परिषदेत माहिती देतांना ‘अमेरिका सीक्रेट सर्व्हिस’चे (अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षांच्या संरक्षण यंत्रणेचे) उपसंचालक मॅथ्यू किन म्हणाले, ‘‘वॉशिंग्टन डी.सी. मधील १५ वा मार्ग आणि इंडिपेंडन्स एव्हेन्यूच्या परिसरात ही घडली. व्हाईट हाऊस कॉम्प्लेक्सच्या बाहेर गस्त घालणार्या सैनिकांना एक बंदुकधारी संशयित व्यक्ती दिसली. ‘सीक्रेट सर्व्हिस’च्या अधिकार्यांनी विचारपूस करण्यासाठी तिच्याजवळ जाण्याचा प्रयत्न केला असता, त्या व्यक्तीने अधिकार्यांच्या दिशेने गोळीबार केला. प्रत्युत्तर म्हणून अधिकार्यांनीही गोळीबार केला. यात ती व्यक्ती घायाळ झाली आहे. तिला तात्काळ रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. या गोळीबारात एक पादचारी किरकोळ घायाळ झाला असून त्यालाही रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. ही घटना घडण्याच्या काही क्षणांपूर्वीच उपराष्ट्राध्यक्ष जे.डी. व्हान्स यांच्या वाहनाचा ताफा याच भागातून गेला होता.’’
Trump Warns Iran : आमच्या सैनिकांना हात जरी लावला, तरी युद्ध पेटेल !
भारत बळजबरीने घुसखोरांना बांगलादेशात ढकलत आहे ! – Bangladesh Allegation
पंतप्रधान मोदी मला फार आवडतात, ते माझे चांगले मित्र ! – Donald Trump
भारतावर दबाव आणणे जागतिक स्थिरतेसाठी अत्यंत घातक ! – Russia President Putin
US Iran War : अमेरिकेच्या संसदेत इराणविरुद्धचे युद्ध थांबवण्याचा ठराव संमत
Paris Riot : फ्रान्स सरकारने या पुढे ‘शून्य सहनशीलते’चे धोरण अंगीकारावे !