मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील कारवाई

मुंबई – येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाने १ आणि २ मे या दिवशी तस्करीविरोधात मोठी मोहीम राबवली. अधिकार्यांनी केलेल्या कारवाईत कोट्यवधी रुपयांचे सोने, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि विदेशी सिगारेट जप्त करण्यात आल्या. यात २ प्रवाशांना कह्यात घेण्यात आले. हे सोने त्यांनी कपड्यांमध्ये आणि शरिरावर लपवून आणले होते.
Mumbai International Airport: 2 passengers detained with gold worth crores
Smuggling rackets must be completely unearthed and all those involved should be imprisoned.
Efforts must be made at the earliest to make Mumbai airport free from smuggling. pic.twitter.com/3138PTqE3z
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 6, 2026
सीमाशुल्क अधिकार्यांनी एका विमानाची तांत्रिक झडती घेतली. विमानाच्या मागील बाजूस असलेल्या दोन शौचालयांच्या पडताळणीत विदेशी शौचालयाच्या आतील भागात चिकटपट्टीने गुंडाळलेली ८ पाकिटे अत्यंत चलाखीने चिकटवून ठेवल्याचे आढळले. त्यात सोने आणि इतर प्रतिबंधित वस्तू लपवलेल्या होत्या. तस्करांनी अवलंबलेली ही पद्धत पाहून अधिकारीही अवाक् झाले. जप्त केलेला सर्व माल सरकारी गोदामात जमा करण्यात आला आहे.
तुर्भे रेल्वेस्थानकाजवळील पदपथांच्या सुधारणेचे काम चालू !
Ram Mandir Donation Theft : श्रीराममंदिरातील दान चोरीनंतर मंदिराचे सरकारीकरण होण्याची शक्यता
बिदर (कर्नाटक) : महाहिंदु मेळाव्याला अनुमती मिळताच समाजकंटकांकडून श्रीरामाचा अवमान !
तुमच्याकडे वर्दी आहे; म्हणजे तुम्ही काहीही करू शकता का ? – Karnataka High Court
इस्लाम स्वीकारल्यास आपोआप ‘मागासवर्गीय मुसलमान’ दर्जा मिळू शकत नाही ! : Madras High Court
कोलकाता : ‘इस्कॉन’ने शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यान्ह भोजनातून अंडे हटवल्याने वाद !