
मुंबई – उन्हाळी सुटीनिमित्त खासगी ट्रॅव्हल्स आस्थापनांनीही तिकिटांचे दर दुप्पट-तिप्पट वाढवले आहेत. कोल्हापूर, कोकण, सोलापूर आणि नाशिक या मार्गांवर तिकिटांचे दर भरमसाठ वाढवलेले आहेत. यावर परिवहन विभागाचे कोणतेही नियंत्रण दिसून येत नसल्याने प्रवासीही टीका करत आहेत.
With ongoing summer vacations, private travel operators in Maharashtra have doubled and even tripled ticket fares.
Holidays and exploitation of passengers have become synonymous. Passengers themselves must raise their voice through lawful means against this and hold private… pic.twitter.com/7bdY96G63c
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 4, 2026
१. झोपण्याची व्यवस्था असलेल्या वातानुकूलित बसमध्ये २ सहस्र ते २ सहस्र ५०० रुपये, तर बसून करण्याच्या प्रवासासाठी १ सहस्र ५०० ते १ सहस्र ८०० रुपये आकारले जात आहेत. हे तिकीट एरव्ही ६०० ते ८०० रुपयांत उपलब्ध असते.
#MAHA Summer Holidays | Private Operators "Surge" 🚌Fare!
Do private operators have a "license" to skyrocket prices. @MLJ_GoI @GoI_MeitY We demand the enforcement of Rule 4(11) of E-Commerce Rules 2020!@ArjunRamMeghwal @AshwiniVaishnaw @uniindianews https://t.co/JQYjc9Nrd1 https://t.co/PtMsagwHto pic.twitter.com/E3sw2RcwqC
— Surajya Abhiyan (@SurajyaAbhiyan) May 4, 2026
२. ‘वर्षभर आमचे दर हे शासकीय गाड्यांच्या तुलनेत समान किंवा न्यून असतात; मात्र देखभाल आणि कर्मचार्यांचे वेतन यांवरील ताण लक्षात घेता सणासुदीच्या काळात दर वाढवावे लागतात’, असे खासगी ट्रॅव्हल्सचे मालक प्रदीप पाटील म्हणाले. (या सगळ्याचा भुर्दंड सामान्यांनाच का ? असे करणे म्हणजे प्रवाशांची लूट करण्याचा प्रकार आहे ! – संपादक)
३. ‘कोल्हापूरसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या जादाच्या गाड्या नाहीत आणि रेल्वेचे तिकीटही मिळणे कठीण असते. त्यामुळे महागडे तिकीट घेण्याविना पर्याय नसतो. शासनाने कोकणाप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रासाठीही जास्तीच्या गाड्या चालू कराव्यात’, असे प्रवासी रोहन पवार यांनी सांगितले.
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
मासेमारांना खोल समुद्रातील संपर्कासाठी ‘सॅटेलाईट फोन’ उपलब्ध होण्यासाठी सरकारचे प्रयत्न !
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !