
नागपूर – राज्यात ३ मेपासून ‘शून्य सावली’ दिवसांचा अनुभव घेता येणार असून ३१ मेपर्यंत विविध शहरांमध्ये काही क्षणांसाठी वस्तूंची सावली नाहीशी होणार आहे. सूर्य बरोबर डोक्यावर (९० अंश कोनात) येतो, तेव्हा कोणत्याही उभ्या वस्तूची सावली पायांखाली येते किंवा अदृश्य होते. पृथ्वीचा अक्ष कललेला असल्यामुळे कर्कवृत्त आणि मकरवृत्त यांमध्ये ही घटना वर्षातून दोनदा घडते.
३ मेपासून ही घटना सावंतवाडी येथे प्रारंभ होणार आहे. त्यानंतर १३ मे या दिवशी पुणे परिसर, १५ मे या दिवशी मुंबई आणि नवी मुंबई, २६ मे या दिवशी नागपूर आणि भंडारा, ३१ मे या दिवशी तोरणमाळ, धुळे येथे शेवट होईल. दुपारी १२ ते १२.३५ पर्यंत हे अनुभवता येईल.
पेठ (ता. आंबेगाव) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘प्रेम खरे कि फसवे ?’ या विषयावर व्याख्यान !
कोल्हापूर जिल्ह्यात ‘इन्स्टाग्राम’वरील ओळखीतून तरुणासमवेत पळून गेलेली १० वर्षांची मुलगी सापडली !
सनातन धर्मासाठी हिंदु जनजागृती समितीसमवेत कार्य करीन ! – पू. स्वामी भक्ती प्रकाशजी महाराज
डोंबिवली येथे ‘महावितरण’चा खांब कोसळून २ दुचाकींची हानी !
तावडे हॉटेल परिसरातील २३ अनधिकृत बांधकामे तोडली : महापालिकेची कारवाई
मदरशातील अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार; शिक्षकाच्या विरोधात गुन्हा नोंद