
गडचिरोली – जिल्ह्यात वाढते तापमान आणि उष्णता यांमुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित होत आहे. काही भागांमध्ये ‘ट्रान्सफॉर्मर’ (विद्युतजनित्र) जळले आहेत. वीजवितरण विभागाकडून तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. काही ठिकाणी नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्याचे काम चालू करण्यात आले आहे.
ट्रान्सफॉर्मरचे तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी विशेष उपाययोजना केल्या जात आहेत. यामध्ये ट्रान्सफॉर्मर थंड ठेवण्यासाठी ‘कूलर’चा (‘हवा थंड करण्याच्या यंत्रा’चा) वापर केला जात आहे. सततच्या उष्णतेमुळे उपकरणांवर ताण येऊ नये, यासाठी प्रयत्न चालू आहेत.
वाढत्या तापमानाचा वीजवाहिन्यांवरही परिणाम झाला आहे. पुरवठा सुरळीत ठेवणे हे प्रशासनासाठी मोठे आव्हान बनले आहे. प्रशासनाकडून नागरिकांना संयम बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वाढत्या तापमानामुळे येथील जनजीवन विस्कळीत होत असल्याचे चित्र समोर आले आहे. प्रखर उष्णतेमुळे रस्ते ओस पडले असून नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत.
पेठ (ता. आंबेगाव) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘प्रेम खरे कि फसवे ?’ या विषयावर व्याख्यान !
कोल्हापूर जिल्ह्यात ‘इन्स्टाग्राम’वरील ओळखीतून तरुणासमवेत पळून गेलेली १० वर्षांची मुलगी सापडली !
सनातन धर्मासाठी हिंदु जनजागृती समितीसमवेत कार्य करीन ! – पू. स्वामी भक्ती प्रकाशजी महाराज
डोंबिवली येथे ‘महावितरण’चा खांब कोसळून २ दुचाकींची हानी !
तावडे हॉटेल परिसरातील २३ अनधिकृत बांधकामे तोडली : महापालिकेची कारवाई
मदरशातील अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार; शिक्षकाच्या विरोधात गुन्हा नोंद