शेण आणि मलमूत्र गटारात सोडणार्‍या  २१ मुसलमान तबेले मालकांच्या विरोधात गुन्हा नोंद !

सार्वजनिक आरोग्याविषयीची मुसलमानांची असंवेदनशीलता यातून दिसून येते !

ए आय निर्मित चित्र

ठाणे, ३ मे (वार्ता.) – कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाने तबेल्यांमधील शेण आणि मलमूत्र थेट गटारांमध्ये सोडून सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण केल्याच्या प्रकरणी दुर्गाडी किल्ला आणि गोविंदवाडी परिसरातील २१ मुसलमान तबेले मालकांच्या विरोधात गुन्हे नोंद केले आहेत.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाच्या ‘क’ प्रभागाचे स्वच्छता अधिकारी जितेंद्र यादव यांनी वारंवार नोटिसा देऊनही नियमांचे उल्लंघन चालूच होते. या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाणे येथे तक्रार प्रविष्ट करण्यात आली. (अशांचे तबेले जप्त करून त्यावर बंदी घालायला हवी ! – संपादक) त्यानुसार शरफुद्दीन कर्ते, अनस मौलवी, मकसूद खोत, शाहिद मौलवी, अफसर मौलवी, सलीम पठाण, फलीम मौलवी, इतलाक मौलवी, हमजा मौलवी, शादाब मौलवी, मौनी मीरसिंद, निसार मौलवी, जलील डोन, इरफान कर्ते, मुजम्मील कर्ते, एजाज कर्ते, मजाज मौलवी, मुंडविल कारेल, सरवर मौलवी, गुलाम अकबर कर्ते आणि अन्य एक यांच्यावर गुन्हे नोंद झाले आहेत.