नवी मुंबईत फळ आणि भाजी बाजारात अनधिकृतपणे शेतमालाची विक्री चालू !

प्रतिकात्मक इमेज

नवी मुंबई – नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वाशी येथील फळ आणि भाजी बाजारात अनधिकृतपणे शेतमालाची विक्री चालू झाली आहे. सचिव तथा पणन संचालक शरद जरे यांनी गेल्या काही महिन्यांपासून अनधिकृत गोष्टींवर नियंत्रण आणले होते; पण त्यांची संचालकपदी नियुक्ती झाल्यापासून पुन्हा आहे तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.

याआधी जरे यांनी शेतमालाची विक्री करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई आणि त्यांचे पंचनामे करून परवानाधारक व्यापार्‍यांचे परवाने निलंबित करण्याची कार्यवाही चालू केली होती. अनेक गाळामालकांनी परवाना नसणार्‍या ५ – ६ जणांना बेकायदेशीरपणे गाळे भाड्याने दिले होते. बाजारात गाळा भाड्याने देऊन महिन्याला ८० सहस्र रुपये ते सवा लाख रुपये भाडे घेणार्‍या व्यापार्‍यांची संख्या ७० हून अधिक आहे. अशा गाळाधारकांचे पंचनामे करण्यात आले आहेत; पण जरे यांना पणन संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आल्यापासून वरील प्रकार पुन्हा चालू झाले आहेत.

संपादकीय भूमिका

या प्रकरणातील संबंधितांना कठोर शिक्षाच करायला हवी !