एम्.आय.एम्.च्या नगरसेविकेचा पती फहीम खान याला अटक !

दंगल प्रकरणातील आरोपी फहीम खान

     नागपूर – मार्च २०२५ मध्ये महाल येथे झालेल्या दंगल प्रकरणातील आरोपी आणि एम्.आय.एम्. नगरसेविका अलिसा खान यांचा पती फहीम खान याला पोलिसांनी अटक केली आहे. या दंगलीत महिला पोलीस कर्मचार्‍यांचा विनयभंगही करण्यात आला होता. त्या वेळी मोठ्या प्रमाणावर तोडफोड झाली होती. त्यात काही पोलीस अधिकारी आणि कर्मचारी घायाळ झाले होते. ‘मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी’चा फहीम खान हा या दंगलीचा सूत्रधार होता. त्याच्या विरोधात गुन्हाही नोंदवण्यात आला. त्याचे घर पाडण्यात आले होते. पोलिसांनी तेव्हा फहीमला अटकही केली होती; पण एका गुन्ह्यात त्याला अटक झाली नव्हती. आता पोलिसांनी त्याला कह्यात घेतले असून त्याचे घर आणि संवेदनशील ठिकाणे येथे बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.