मुंबईतून १ सहस्र ७४५ कोटी रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त !

मुंबई – अमली पदार्थ नियंत्रण विभागाने मुंबईमध्ये तब्बल १ सहस्र ७४५ कोटी रुपयांचा ३४९ किलो ‘कोकेन’ या अमली पदार्थाचा साठा पकडला आहे. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी ‘एक्स’वरून या कारवाईची माहिती दिली. ‘बॉटम टू टॉप’ (खालच्या स्तरापासून ते वरच्या पातळीपर्यंत) कारवाईचे हे उत्तम उदहारण आहे, या शब्दांत शहा यांनी या कारवाईचे कौतुक केले.

‘अमली पदार्थ नियंत्रण विभागाने अमली पदार्थांच्या एका मोठ्या आंतरराष्ट्रीय जाळ्यावर कडक कारवाई करून उच्च दर्जाचे कोकेन जप्त केले आहे. अमली पदार्थांच्या टोळ्यांना निर्दयपणे नष्ट करण्याचा आम्ही निर्धार केला आहे’, असे शहा यांनी म्हटले.

संपादकीय भूमिका

अमली पदार्थांच्या व्यवसायातून निर्माण होणारा पैसा जिहादी आतंकवादाच्या विस्तारासाठी वापरला जातो. आता एवढ्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांचा साठा हस्तगत झाला असला, तरी प्रत्यक्षात हे हिमनगाचे टोक नाही ना, याची निश्चितीही झाली पाहिजे !