दाभोलकर खटल्यातील हिंदुत्वनिष्ठ युवक शरद कळसकर यांना जामीन !

मुंबई – दाभोलकरांच्या हत्येनंतर तत्कालीन काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी तासाभरातच थेट हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडे बोट दाखवले आणि अन्वेषण त्या दिशेनेच चालू झाले. ‘प्लँचेट’चा वापर करून ‘सनातन संस्थेचे नाव दाभोलकर यांचा आत्मा घेत आहे’, असे दाखवले जात होते, तर कधी तसे थेट आरोप दाभोलकरांचे कार्यकर्ते करत होते. हे सर्व चालू असतांना सनातन संस्था आणि तिचे साधक यांनी संपूर्ण अन्वेषणाला शांतपणे तोंड दिले. कधीही ‘अन्वेषण यंत्रणांना सहकार्य केले नाही’, असा आरोप संस्था किंवा संस्थेचे साधक यांच्यावर झाला नाही. या पार्श्वभूमीवर वर्ष २०१५ ते २०२३ या कालावधीत या प्रकरणाचे अन्वेषण उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चालू होते. मग अशा परिस्थितीत अन्वेषणात संस्थेच्या विरोधात काहीच मिळाले नाही. ५ जणांपैकी ३ जणांची निर्दोष मुक्तता सत्र न्यायालयाने यापूर्वीच केली आहे. शिक्षा झालेल्या दोघांपैकी एकाचा, म्हणजे शरद कळसकर या हिंदुत्वनिष्ठ युवकाचा जामीन २९ एप्रिल या दिवशी मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. उच्च न्यायालयाने ‘आरोपी शरद कळसकर घटनास्थळी होता, हेच सिद्ध झालेले नाही’, असे मानून हा जामीन दिलेला आहे, हे अतिशय महत्त्वाचे आहे. गेली १० वर्षे सनातन संस्था सांगत होती की, यात संस्थेचा सहभाग नाही, तरी पुन्हा पुन्हा संस्थेला गुंतवण्याचा प्रयत्न झाला. निदान आता न्यायालयाच्या निर्णयांनंतर तरी हे लोक शांत बसतील का ?, असा प्रश्न सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक यांनी उपस्थित केला.
Justice prevails!
In the Narendra Dabholkar case, today’s bail granted to staunch Hindu Sharad Kalaskar raises a fundamental question: has the narrative of the past decade been driven by evidence, or by a preconceived agenda?
Crucially, the High Court granted bail noting that… pic.twitter.com/9v8ORuMZBX
— Sanatan Sanstha (@SanatanSanstha) April 29, 2026
श्री. वर्तक पुढे म्हणाले की,
या प्रकरणात वेळोवेळी दाभोलकर कुटुंबियांची ‘दाभोलकरांचे खरे खुनी नाही सापडले तरी चालतील; किंबहुना खरे खुनी सोडा; पण सनातनच्या साधकांना वाट्टेल ते करून अडकवा’, अशीच भूमिका शेवटपर्यंत राहिलेली दिसली. याचा अर्थ त्यांना दाभोलकरांच्या खर्या मारेकर्यांशी देणेघेणे नसून केवळ हिंदुत्वनिष्ठांना चिरडायचे होते. आम्ही हिंदु संघटना म्हणून अन्याय झालेल्या प्रत्येक हिंदूच्या पाठीशी आहोत आणि यापुढेही राहू.
How many more years will accusations against @SanatanSanstha continue ? : @AbhayVartak Spokesperson
In the Narendra Dabholkar case, Sharad Kalaskar gets bail as the Bombay High Court found no proof of his presence.
For years, Sanatan Sanstha faced allegations, yet nothing… pic.twitter.com/CDuZ8MZ3oR
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 1, 2026
या जामिनासाठी न्यायालयीन लढा देणारे ज्येष्ठ अधिवक्ता नितीन प्रधान, अधिवक्त्या सिद्धविद्या, अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, अधिवक्त्या शुभदा खोत आणि सहयोगी सर्व अधिवक्ते यांचे आम्ही मनापासून अभिनंदन करतो. आमची न्यायदेवतेवर श्रद्धा आहे की, या दोघांनाही न्याय मिळून लवकरच हेही निर्दोष मुक्त होतील.
ग्राहकाला ४० सहस्र रुपये हानीभरपाई द्या ! – ‘ग्राहक विवाद निवारण आयोगा’चा टपाल कार्यालयाला आदेश
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ आणि ‘लेक लाडकी’ योजनांवर ‘कॅग’चा ठपका !
मुंबईत जुहूच्या समुद्रकिनार्यावर कचर्याचे साम्राज्य !
भारत-पाक सीमेवर असलेल्या बेकायदेशीर मशिदी, दर्गे पाडण्याच्या विरोधातील याचिका राजस्थान उच्च न्यायालयाने फेटाळल्या
Vaishno Devi Fake Silver : जम्मू न्यायालयाने पोलिसांकडून मागवल्या नोंदी !
Gujarat ATS Action : भगवान जगन्नाथांच्या रथयात्रेपूर्वी गुजरातमध्ये ५ आतंकवाद्यांना अटक