नागपूर : महसूल साहाय्यकाला ५ लाख रुपयांची लाच घेतांना अटक !

नागपूर – येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील एका भ्रष्ट महसूल साहाय्यकाला ५ लाख रुपयांची लाच स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. २४ एप्रिलच्या रात्री ही कारवाई करण्यात आली. तक्रारदाराच्या बांधकामाचे प्रकरण निकाली काढण्यासाठी आरोपीने ५ लाख रुपयांची मागणी केली होती. ‘एसीबी’ने या तक्रारीची पडताळणी करून रात्री ११.३० च्या सुमारास सापळा रचला. आरोपीने लाचेची रक्कम स्वीकारताच त्याला पंचांसमक्ष घेण्यात आले. आरोपीकडून ५ लाख रुपये आणि आयफोन जप्त करण्यात आला.

संपादकीय भूमिका

प्रशासकीय यंत्रणेत बोकाळलेला भ्रष्टाचार म्हणजे लोकशाहीला लागलेली कीड आहे. जनतेच्या कामासाठी लाखो रुपयांची लाच मागणार्‍या अशा अधिकार्‍यांवर कठोर कायदेशीर कारवाई होऊन त्यांना कायमस्वरूपी सेवेतून बडतर्फ करायला हवे !