सकाळी परशुरामाच्या प्रतिमेचे पूजन आणि अभिषेक करून कार्यक्रमाला प्रारंभ झाला. शहरातून भव्य दुचाकी फेरी काढण्यात आली.

सांगोला – येथे ‘भगवान परशुराम जन्मोत्सवा’निमित्त ब्राह्मण समाजाच्या वतीने विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे उत्साहात आयोजन करण्यात आले. सकाळी परशुरामाच्या प्रतिमेचे पूजन आणि अभिषेक करून कार्यक्रमाला प्रारंभ झाला. शहरातून भव्य दुचाकी फेरी काढण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी ‘रंगभरण’ आणि वर्क्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. सांगोला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आले. ह.भ.प. श्रीकांत आरोळे महाराज यांनी व्याख्यानातून परशुरामाच्या जीवनकार्याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाने करण्यात आली.
‘एस्.एन्.डी.टी. महिला विद्यापिठा’च्या कारभाराची चौकशी होणार !
कचरा प्रकल्पाच्या निविदेचे शुल्क अल्प करण्याची महापालिका आयुक्तांची चेतावणी !
परभणी येथील संत कालिदास महाराज यांचे देहावसान
५ जणांना कापूरबावडी पोलिसांकडून समजपत्र !
नाशिकच्या जलसंवर्धन योजनेची राष्ट्रीय स्तरावर नोंद !
ठाणे येथे २५ वर्षांपासून गढूळ पाण्याचा पुरवठा; संतप्त नागरिकांचा महानगरपालिकेवर मोर्चा