
डिचोली, २५ एप्रिल (वार्ता.) – चेल्सिया रॉड्रीग्स या ख्रिस्ती व्यक्तीकडून श्री लईराईदेवीच्या धोंडांचा (व्रतस्थ भाविक) सामाजिक माध्यमावरून अवमान करण्यात आला आहे. यासंबंधी त्यांच्या विरोधात काही हिंदुत्वनिष्ठांनी डिचोली आणि मुरगाव पोलीस ठाण्यांत तक्रार नोंदवली आहे. या तक्रारीत म्हटले आहे, ‘‘चेल्सिया रॉड्रीग्स यांनी श्री लईराईदेवीचे धोंड अग्नीकुंडाभोवती नामघोष करत प्रदक्षिणा घालतात त्याला मंकी डान्स (मर्कट नृत्य) असे संबोधले असून ते अत्यंत अवमानकारक असून त्यामुळे हिंदू बांधवांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. हे कृत्य हेतूपूर्वक केले असून द्वेषापोटी हिंदु धर्माचा अवमान केला आहे. यामुळे सामाजिक अस्थिरता निर्माण होऊ शकते. त्यामुळे धर्मिक भावना दुखावणारे हेतूपूर्वक द्वेषपूर्ण कृत्य करणे, समाजातील वेगवेगळ्या गटांमध्ये शत्रूत्व निर्माण करणे यांसाठी भारतीय दंड संहितेचे कलम २९५ अ ,१५३ अ , ५०५(२) नुसार आणि आक्षेपार्ह लिखाण प्रसारित करणे यासाठी माहिती तंत्रज्ञान कायदा २००० च्या कलम ६७ नुसार चेल्सिया रॉड्रीग्स यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी विनंती आम्ही करत आहोत.’’

चेल्सिया रॉड्रीक्स यांनी श्री लईराईदेवीचे धोंड अग्नीकुंडाभोवती नामघोष करत प्रदक्षिणा घालत असतांनाचेछायाचित्र ‘पोस्ट’ करून त्याखाली ‘स्टॉप धिस मंकी डान्स’ (हे मर्कटनृत्य थांबवा) असे लिहिले होते.
मुरगाव येथेही चेल्सिया रॉड्रीग्स याच्या विरोधात तक्रार
मुरगाव – याच सूत्रावरून मुरगाव तालुक्यातील हिंदुत्वनिष्ठांनी मुरगाव पोलीस ठाण्यात समस्त हिंदूंच्या वतीने तक्रार केली. मुरगावचे पोलीस उपअधीक्षक गुरुदास कदम यांनी ही तक्रार स्वीकारली आणि हिंदुत्वनिष्ठांचे म्हणणे ऐकून घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. या वेळी मोठ्या संख्येने हिंदू धर्मप्रेमी उपस्थित होते.
हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या मागणीला शिक्षण खात्याचा सकारात्मक प्रतिसाद !
अनुमतीविना म्हादई वन्यजीव अभयारण्यात प्रवेश करणार्या ५ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा नोंद
शाळांमध्ये अतिरेकी आणि राष्ट्रविरोधी विचारसरणीला थारा नसावा ! – नितीन फळदेसाई
मुंबईत ‘डबेवाले’ बांधवांच्या सन्मानार्थ वैद्यकीय पडताळणी आणि पाद्यपूजा !
भारतात अवैधरित्या वास्तव्यास असलेला अमेरिकेचा माजी सैनिक कह्यात
गोव्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील सुधारणांसाठी १८० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत