पुणे रेल्वेस्थानकातील सुरक्षायंत्रणा अत्यंत कमकुवत; समस्येची मेधा कुलकर्णी यांच्याकडून पहाणी
तातडीने सुरक्षा व्यवस्था भक्कम करण्यासाठी दिल्या सूचना

पुणे – रेल्वेस्थानकामध्ये विनातिकीट फिरणार्यांची संख्या अधिक दिसते. सुरक्षायंत्रणा अत्यंत कमकुवत असून घटना घडून गेल्यानंतरच त्रुटी शोधण्यापेक्षा त्या आधीच शोधून त्यावर गांभीर्याने निर्णय घ्यावेत. रेल्वेस्थानकावरील सुरक्षा व्यवस्था तातडीने भक्कम करावी, हलगर्जीपणा करणार्यांवर कारवाई करावी, अशा सूचना भाजपच्या राज्यसभेच्या खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी यांनी विभागीय रेल्वे व्यवस्थापक राजेश वर्मा यांना दिल्या. (अशा सूचना का द्याव्या लागतात ? रेल्वे प्रशासन समस्या जाणून त्या सोडवण्यासाठी कार्यक्षम नाही का ? – संपादक) रेल्वेस्थानकावर प्रवाशांना येणार्या अडचणी, समस्या यांची नोंद घेत राज्यसभा खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी यांनी नुकतीच पुणे रेल्वेस्थानकाची पहाणी केली. रेल्वे विभागाने केलेल्या उपाययोजनांची माहिती घेत समस्यांविषयी चर्चा केली.
‘रेल्वेस्थानक परिसरात व्यसनाधीन व्यक्तींची वर्दळ, चोर्या, महिलांवर अत्याचार यांसारख्या घटना वारंवार घडत असून हे अत्यंत गंभीर आहे. रेल्वेस्थानकावर तिकीट पडताळणी करणारे अधिकारी (टी.सी.) अपुरे असून ती संख्या वाढवावी. स्थानकावरील दुकान (स्टॉल) वाटप प्रक्रियेत स्थानिक लोकांना प्राधान्य द्यावे’ इत्यादी सूचना प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी यांनी केल्या.
थोडक्यात महत्त्वाचे : ०६.०६.२०२६
‘श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसर विकास आराखड्या’तील १३६ जागांचे सर्वेक्षण पूर्ण ! – डॉ. विजय राठोड, जिल्हाधिकारी, कोल्हापूर
बोपोडी येथील दर्ग्यावर महापालिकेची कारवाई !
हिंजवडी ‘आयटी पार्क’ मधील ‘थिंकटेक इंडिया’ आस्थापन रातोरात बंद !
आरे परिसरातील ८० एकर जागेत ५ लाख वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ !
श्री महालक्ष्मीदेवी मंदिरासह परिसरातील गड-दुर्ग यांना एकत्र करून ‘टुरिस्ट सर्किट’ करणार ! – शंभूराज देसाई, खनिजकर्ममंत्री