पीडित कुटुंबाला सुरक्षा पुरवण्याचा देहली उच्च न्यायालयाचा आदेश !
नवी देहली – देहलीतील उत्तमनगरमध्ये होळीच्या दिवशी झालेल्या हिंदु तरुणाच्या हत्येप्रकरणी देहली उच्च न्यायालयाने पीडित कुटुंबाच्या सुरक्षेविषयी देहली पोलिसांना कडक निर्देश दिले. न्यायालयाने म्हटले की, कुटुंबाच्या सुरक्षेमध्ये कुठलीही कमतरता रहाता कामा नये. १३ एप्रिल २०२६ या दिवशी आरोपी पक्षातील बाबू खान आणि त्याच्या गुंडांनी मिळून पीडित हिंदु कुटुंबाला धमकावले होते. त्यांनी म्हटले होते की, एकाला मारले, आता दुसर्याची पाळी आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेनंतर हिंदु कुटुंबाने ‘घर विकणे आहे’असा फलक लावला आहे.
हे प्रकरण ४ मार्च २०२६ या दिवशी घडले होते. या दिवशी उत्तमनगरमधील जे.जे. कॉलनीमध्ये एका तरुणाने मुसलमान महिलेवर पाण्याने भरलेला फुगा फेकला होता. यामुळे संतप्त होऊन मुसलमान जमावाने तरुणाला बेदम मारहाण केली. त्यात तरुणाचा मृत्यू झाला. सध्या या प्रकरण देहली उच्च न्यायालयात खटला चालू आहे. या प्रकरणी सुनावणीच्या वेळी पोलिसांनी सांगितले की, पीडित कुटुंबाच्या सुरक्षेसाठी चोख बंदोबस्त करण्यात आला आहे.

‘एस्.आय.आर्.’ प्रक्रिया करण्यार्या शिक्षकाला ३ धर्मांधांकडून मारहाण !
अयोध्या : पवित्र शरयू नदीत मटण आणि मद्य यांची मेजवानी करणार्या तिघा हिंदूंना अटक !
श्रीरामांचा अवमान केल्यामुळेच कट्टर शहरी नक्षलवादी अभिजीत दिपके यांच्यावर शाई फेकली ! – Barkha Trehan
कर्नाटकात शाळांजवळ पिझ्झा-बर्गर यांच्या विक्रीवर लवकरच बंदी !
राज्यपालांची ‘छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालया’ला भेट !
संपादकीय : ‘इस्रो’पुढील आव्हाने !