
उरण (रायगड) – येथील गॅसधारकांशी अरेरावी करणे, उद्धटपणे बोलणे, बेकायदेशीरपणे गॅस सिलिंडर विकून काळाबाजार करणे अशा अनेक प्रकारच्या तक्रारी वाढत असल्याने ‘शकुंतला भारत गॅस’ या आस्थापनावर तालुका प्रशासनाने कायदेशीर कारवाई केली आहे. या आस्थापनाला सिलिंडरचा पुरवठा तात्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले असून वितरणाचा परवानाही रहित करण्यात येणार असल्याची माहिती तालुका पुरवठा अधिकारी गजानन देशमुख यांनी दिली.
या आस्थापनाकडे ‘भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड’ आस्थापनाकडून व्यावसायिक एल्.पी.जी. सिलिंडर विक्रीचा अधिकृत परवाना आहे; मात्र सिलिंडर वितरण करतांना राज्य सरकारने ठरवून दिलेल्या प्राधान्यक्रमाचे पालन न करता गॅसधारकांशी अरेरावी करणे, अनधिकृत आणि नोंदणी नसलेल्या व्यक्तींना सिलिंडर वाटणे अशा अनेक तक्रारी उरण तहसील कार्यालयाकडे प्राप्त होत होत्या. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये एल्.पी.जी. पुरवठ्याविषयी अपसमज निर्माण होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन उरणचे तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांनी तात्काळ कारवाईचे निर्देश दिले.
तालुका पुरवठा अधिकारी गजानन देशमुख यांनी तातडीने ही कार्यवाही केली. त्यावाषयीचे अनुपालन अहवाल सादर केले जातील. ‘भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड’ला ही माहिती कळवण्यात आली. पनवेल येथील वारंगे बंधू यांच्या ‘पनवेल गॅस सर्व्हिस’ला उरण तालुक्यात घरगुती गॅस सिलिंडरचे वितरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित