संयुक्त जयंती सोहळ्याचे निमित्त, युवकांमध्ये शौर्यजागृतीचा संकल्प !

हडपसर (पुणे) – येथील ‘शिवशंभु प्रतिष्ठान’च्या वतीने नुकतेच मर्दानी खेळ प्रशिक्षण शिबिर आणि वृक्षारोपण कार्यक्रम यांचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, जोतिबा फुले आणि महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीचा संयुक्त सोहळाही उत्साहात पार पडला. ‘शिवशंभु प्रतिष्ठान’चे संस्थापक श्री. अक्षय आबनावे यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ‘जय भारत मित्र मंडळ’, विश्व हिंदु परिषद, तसेच प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी विशेष परिश्रम घेतले.
मान्यवरांची उपस्थिती !
कार्यक्रमासाठी भाजपचे नगरसेवक मारुति आबा तुपे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका वैशाली बनकर, भाजपच्या नगरसेविका उज्वला जंगले, ठाकरे गटाचे नगरसेवक नितीन गावडे, सौ. पल्लवी सुरसे आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभली.
शौर्यजागर आणि पर्यावरण रक्षण यांचा संगम !
कार्यक्रमाचे उद्घाटन गुरुवर्य श्री. आनंदजी पिंपळकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या प्रसंगी उपस्थित युवकांना प्रशिक्षक ओंकार लव्हे यांनी मर्दानी खेळांचे शास्त्रोक्त प्रशिक्षण दिले. आजच्या काळात स्वसंरक्षण आणि शारीरिक स्वास्थ्य यांसाठी या पारंपरिक खेळांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. पर्यावरणाचे रक्षण करण्याच्या उद्देशाने परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
राष्ट्रीय आयोगाकडून पिंपरी-चिंचवड महापालिकेला नोटीस !
शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे पोलिसांना शरण !
प्रत्येक पात्र मतदाराची अचूक नोंद सुनिश्चित करावी ! – एस्. चोकलिंगम, मुख्य निवडणूक अधिकारी
अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याने हॉटेल, बेकरी, डेअरी यांचे परवाने निलंबित !
उल्हासनगर येथील गोठ्यांतून ‘ऑक्सिटोसिन’च्या ६१२ बाटल्या जप्त !
‘राजेश नाईक फाऊंडेशन’कडून फलटण येथे वारकर्यांना राजगिराचे लाडू, तसेच फराळ वाटप !